Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर गुंडांनी केला जीवघेणा हल्ला

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पत्रकार संदीप महाजन यांच्यावर गुंडांनी केला जीवघेणा हल्ला
आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप


पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. यात संदीप महाजन हे जखमी झाले असून किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जिवितास धोका असल्याची तक्रार महाजन यांनी पोलिसात केली आहे.

पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली होती.

त्यानंतर संदीप महाजन गुरुवारी रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. पाचोरा नगरपालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावानं ओळखला जातो. येथेच त्यांना लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण करण्यात आली. महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.

काय ती भाषा..!:शिंदे गटाच्या MLAची पत्रकाराला शिवीगाळ; हात-पाय तोडण्याची भाषा अन् वर म्हणतो…ही बाळासाहेबांची स्टाईल!

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट जाब विचारणाऱ्या यूट्यूब पत्रकार संदीप महाजन यांना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ केल्याची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे

सदर ऑडिओ क्लिपमद्ये आमदार किशोर पाटील यूट्यूब पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ करत असल्याची बाब ऐकावयास मिळत आहे. एवढेच नाही तर ते त्याला हात – पाय तोडण्याची धमकीही देताना ऐकून ऐकू येत आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, गोंडगाव येथील 8 वर्षीय मुलगी 30 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. गावातील स्वप्नील पाटील नामक तरुणाने बलात्कार करून तिची हत्या केल्याचे 1 ऑगस्टला उघड झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने 48 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांवर दडकफेक केली. तसेच 4 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर विविध संघटना व सर्वपक्षीयांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे व विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी या प्रकरणी करण्यात आली होती.

नेमके प्रकरण काय?

बलात्कार व हत्येचे प्रकरण उजेडात आल्यानंतर आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमीत पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून दिला. त्यात पीडित कुटुंबीयांनी हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगत पोलिसांशी बोलतो असे म्हणत त्यांची बोळवण केली. हा प्रकार निदर्शनास येताच यूट्यूब पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची ‘चमकोगिरी’ अशा आशयाची बातमी दिली.

कारवाईची मागणी

महाजन यांच्या वृत्तामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना शिवीगाळ केली. तू कुठे राहतो? तुझे हात-पाय तोडतो अशी धमकी त्यांनी दिली. या संभाषणाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली असून किशोर पाटील यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

‘होय, मी केली शिवीगाळ -पाटील

या प्रकरणी आमदार किशोर पाटील यांना छेडले असता त्यांनी आपण सदर पत्रकाराला शिवीगाळ केल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, जी क्लिप व्हायरल होत आहे, ती निश्चितपणे माझीच आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मुख्यमंत्री चमकोगिरी करतात, अशी तुमची पत्रकारिता आहे का? जर असं म्हणत असाल तर माझ्या नेत्यासाठी, माझ्या मुख्यमंत्र्यांसाठी मी शिवीगाळ केली. ज्याला घटनेचं गांभीर्य नाही, अशा पत्रकाराला मी शिव्या दिलेल्या आहेत

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना फोन करून शिवीगाळ केली होती. किशोर पाटील यांना पत्रकाराला हात-पाय तोडण्याची धमकीही दिली होती. याची ऑडियो क्लिपही व्हायरल झाली होती. या धमकीनंतर आता पत्रकाराला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारला घेरले आहे.

आमदार रोहित पवार यांनी संदीप महाजन यांच्या मारहाणीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रिपोर्टींग करून घरी परतणाऱ्या महाजन यांना काही लोक रस्त्यात अडवून, खाली पाडून मारहाण करताना दिसताहेत. हा व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.


जळगावमधील पत्रकार संदीप महाजन यांना भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. ही कोणत्या प्रकारची दादागिरी आहे, असा सवाल विचारतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र मणिपूरच्या दिशेने चालला आहे की काय, असा प्रश्न निर्माण व्हायला लागल्याचे म्हटले आहे.

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना फोन करून शिवीगाळ केली होती. किशोर पाटील यांना पत्रकाराला हात-पाय तोडण्याची धमकीही दिली होती. याची ऑडियो क्लिपही व्हायरल झाली होती. या धमकीनंतर आता पत्रकाराला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांन महाराष्ट्रात भाजप राहुल गांधी यांनी दिलेल्या फ्लाईंग किसविरोधात आंदोलन करणार असल्याबद्दलचा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, जंतर मंतरला महिला कुस्तीपटू बसल्या होत्या तेव्हा भाजपचे कोणी तिथे का गेले नाही? राहुल गांधींनी द्वेष, बदला यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला. जादूची झप्पी असते तसा जादूका फ्लाईंग किस त्यांनी दिला. मोहब्बतच्या दुकानातील ते एक महत्त्वाचे शस्त्र आहे. ज्यांना प्रेमाची सवय उरलेली नाही, ममत्व उरलेले नाही अशांना हे फ्लाईंग किस काय आहे हे कळणार नाही.

संजय राऊत यांची शिवसेनेच्या पॉडकास्ट अर्थात आवाज कुणाचामध्ये सविस्तर मुलाखत घेण्यात आली आहे. याचा एक प्रोमो प्रसिद्ध झाला असून यातील त्यांच्या ईडी ही दहशतवादी संघटना आहे एका वाक्याबाबतही राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ज्या गोष्टींचा तपास पोलिस , राज्याचा आर्थिक गुन्हे विभाग करू शकतो तिथे ईडी घुसवायची आणि केंद्र सरकारने त्यावर नियंत्रण ठेवायचं आणि विरोधकांना दडपशाहीच्या मार्गाने आपल्याकडे खेचायचे असे प्रयत्न सुरू आहे. हे पाहिले तर अनेक केंद्रीय तपास यंत्रणा या दहशतवाद करत आहे. हे मी सांगत नसून हरीश साळवे यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. ईडीला आवरले नाही तर देशात अराजक निर्माण होईल असे साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.
Previous Post Next Post