Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गंजगोलाई येथे पोलिसांची "मॉक ड्रिल"

       लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गंजगोलाई येथे पोलिसांची "मॉक ड्रिल"




लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गंजगोलाई येथे पोलिसांची "मॉक ड्रिल"

           राज्यातील कोणत्याही दहशतवादी हल्याच्या प्रंसगी प्रसंगअवधान राखुन करावयाच्या कार्यपद्धती संबधात लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गजबजलेल्या गंजगोलाई परिसरात दिनांक 10/08/2023 रोजी दोन दहशतवादी काहीतरी घातपात कृत्य करण्यासाठी लपून बसल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळताच लातूर जिल्यातील पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचुन कोणतीही जिवीत/वित्तहानी न होवु देता दोन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
                 तसेच बिडीडीस, श्वान पथक व आय.कारच्या साह्याने सदर दहशतवाद्यांनी त्यांनी दबा धरून बसलेल्या ठिकाणी स्फोटक पदार्थ ठेवल्याची शक्यता असल्याने तपासणी करण्यात आली. फॉरेन्सीक लॅब मार्फतीने घटनास्थळाचे भौतीक दुवे तपासण्यात आले. ताब्यात घेतलेले दहशतवादी यांना स्थानिक पोलीस ताब्यात देण्यात आले. तसेच ट्राफिक अंमलदारांच्या मदतीने रस्तावरील गर्दी सुरळीत करण्यात आली. तसेच स्टेशनवरील झालेला गोंधळ मेगा फोन व्दारे सुचना देवुन नियंत्रणात आणण्यात आला.
            सदर रंगीत तालीम (मॉक ड्रील) पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर (चार्ज) गोसावी निरीक्षक, प्रशि. पोलीस उपाधीक्षक अनिता कणसे, स्थागुशा संजीवन मिरकले, नांदेड दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी चंदेल, पोलीस उपनिरीक्षक जितूसिंग, पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी, लातूर दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, सहायक फौजदार आगंद कोतवाड, युसुफ शेख, मुक्तार शेख ,संजय काळे, उत्तम जाधव, चालक यशवंत मुंडे,दिपक वैष्णव ,राखीव पोलीस निरीक्षक गफार शेख ,बिडीडीएस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, बिडीडीएस पथक, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, तसेच अंगुलीमुद्रा विभाग, वैदयकीय स्टाफ, अग्निशामकदल, व जलद कृती दल (क्युआरटी), दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) फोटोग्राफर सुहास जाधव असे हजर होते..
        सदर रंगीत तालीम ही दिनांक 10/08/2023 चे दुपारी 4 वाजले पासून ते 5 वाजेपर्यंत घेण्यात आली.

*दक्षता जनतेच्या सुरक्षेची..*
             अतिरेकी कारवायांच्या घटना घडत असताना शहरभर शांतता, सुव्यवस्थेसाठी सर्वत्र ‘मॉक ड्रील’ मोहीम राबवण्यात येते. एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारी अशा मोहिमांमधून राबवण्यात येते. यातून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे. यात काय उणिवा राहिल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. पुढील काळात त्या होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येते. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रात्यक्षिके घेण्यात येतात.
         दहशतवादी हल्ला झाल्यास पोलीसांनी काय करावे तसेच नागरीकांनी प्रसंग अवधान राखुन काय काळजी घ्यायला पाहीजे या बाबत सदर रंगीत तालीमव्दारे दर्शविण्यात आले. तसेच नागरीकांना जागरुक राहुन शहराच्या शांततेच्या अनुषंगाने काहीही माहीती असल्यास नियंत्रण कक्ष, लातूर फोन क्र.02382-242296, डायल 112 वर संर्पक करुन कळवावे असे अवाहन लातूर जिल्हा पोलीस दलांच्या वतीने करण्यात येत आहे.
Previous Post Next Post