Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शेतकर्‍यांना एकरी एक लाख रुपयांची मदत करा,मनसेचे जिल्हाधीकरी कार्यालयासमोर आंदोलन

शेतकर्‍यांना एकरी एक लाख रुपयांची मदत करा,मनसेचे जिल्हाधीकरी कार्यालयासमोर आंदोलन







लातूर-- जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पाऊस नाही त्यामुळे पिके सुकली आहेत, अगोदरच उशिरा पेरणी झाली, काही शेतकर्‍यांचे बियाणे उगवले नाही, पीक गोगलगायीने खाल्ले, उरल्या सुरल्या पिकानी माना टाकल्या आहेत. पीक विमा कंपनीचे अधिकारी कर्मचारी पंचनामा करायला तयार नाहीत, अशा परिस्थितीत हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी करायचं काय असा सवाल करत मनसेने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.तसेच शेतकर्‍यांना एकरी एक लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. मागणी मान्य नाही झाली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
     लातूर जिल्ह्यात पावसाने 21 दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतकर्‍यांच्या पिकांनी माना टाकल्या असून पीक जिल्हाभर वाळत आहे तरी शासनाने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा शेतकरी सेनेचे प्रदेशअध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेने केलेल्या आंदोलनादरम्यान केली.
   आठवड्यात जर शासनाने दुष्काळ जाहीर नाही केला तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही व संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी सोबतीला घेऊन रस्त्यावर उतरू असा सज्जड इशारा दिला आहे.या तीव्र निदर्शने आंदोलनात मोठया संख्येने जमलेल्या मनसैनिकांनी बराच काळ जोरदार घोषणाबाजी केली.आंदोलनाची सांगता जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन करण्यात आली.ज्यात जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे होणार्‍या नुकसानीसाठी शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
     या आंदोलनात संतोष नागरगोजे,नर्सिंग भिकाने,शिवकुमार नागराळे,संजय राठोड,भागवत शिंदे,बाळासाहेब मुंडे,रणवीर उमाटे, संग्राम रोडगे,सोमनाथ कलशेट्टी,महेश देशमुख, श्रीनिवास शिंदे,रवी सूर्यवंशी,सचिन शिरसाठ,अंकुश शिंदे ,किरण चव्हाण,प्रीतीताई भगत,महेश माने,वाहीद शेख,मनोज अभंगे,अनिल जाधव,रामदास पाटील,संतोष भोपळे,सुनील तोडचीरकर,परमेश्‍वर पवार,जहांगीर शेख,अनिल जाधव,बजरंग ठाकूर,अजिंक्य मोरे,ऋषिकेश माने,संतोष जाधव,शुभम चंदनशिवे,रामदास तेलंगे,गुरुदास घोणसे,अनिल भंडे,पवन राजे,मेहत्रे लाला, मोहिते भोसले,सचिन बिरादार,महेश बनसोडे,पवन सरवदे,सचिन इगे,सुरेश गालफाडे,चेतन चव्हाण,विशाल कातळे,लक्ष्मण लांडगे आधीसह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous Post Next Post