Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर - मुंबई "वंदे भारत" रेल्वे सुरू करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी रेल्वेमंत्री यांना केली मागणी

लातूर - मुंबई "वंदे भारत" रेल्वे सुरू करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी रेल्वेमंत्री यांना केली मागणी


लातूर/प्रतिनिधि 
लातूरहून मुंबईला जाण्यासाठी केवळ एकच रेल्वे असून या गाडीत प्रवाशांना जागा मिळणेही कठीण जात आहे, या मार्गांवर प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लातूर - मुंबई या मार्गावर "वंदे भारत” ट्रेन सुरू करावी, या माध्यमातून प्रवाशांची सोय होण्यासोबतच रेल्वेच्या महसुलातही भर पडणार आहे.या बाबात श्री अश्विनीजी वैष्णव,रेल्वेमंत्री, भारत सरकार यांना भाजपा जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी निवेदन देवून मागणी केली

देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील "अमृत भारत” योजनेत लातुरच्या रेल्वे स्टेशनचा समावेश करून लातूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी आभार मानले.
लातूर हे मराठवाड्यातील विकसनशील शहर असून शिक्षणाचा लातूर पॅटर्न देशात प्रसिद्ध आहे. लातूर येथे नामांकित बाजारपेठ असून राज्याच्या सीमावर्ती भागाशी लगट असणारे हे शहर आहे. त्या भागातील नागरिकांचा लातूरशी दैनंदिन संपर्क आहे. लातूरसह सीमावर्ती भागातील नागरिकांना मुंबई येथे जाण्यासाठी हाच मार्ग आहे. रेल्वे मार्गाने मुंबईस जाण्यासाठी बीड व शेजारील जिल्ह्यातील नागरिकांना लातूर मार्गेच जावे लागते.
लातूरहून मुंबईला जाण्यासाठी केवळ एकच रेल्वे असून या गाडीत प्रवाशांना जागा मिळणेही कठीण जात आहे, या मार्गांवर प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लातूर - मुंबई या मार्गावर "वंदे भारत” ट्रेन सुरू करावी, या माध्यमातून प्रवाशांची सोय होण्यासोबतच रेल्वेच्या महसुलातही भर पडणार आहे.या बाबात श्री अश्विनीजी वैष्णव,
रेल्वेमंत्री, भारत सरकार यांना निवेदन देवून मागणी केली. रेल्वेमंत्र्यांनी या मागणीचा विचार करून लातूर ते मुंबई "वंदे भारत” ट्रेन सुरू करावी, अशी विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी पुढाकार घेवून करण्यात आली आहे.
या प्रसंगी मा खासदार श्री सुधाकरजी शृंगारे, शहर जिल्हाध्यक्ष मा देविदासजी काळे,ग्रामीण अध्यक्ष, दिलीपराव देशमुख, ॲड दिग्विजय काथवटे ,श्री प्रवीणजी सावंत, श्री शिरीषजी कुलकर्णी, श्री प्रदीपजी मोरे, रवि सुडे,श्री विशाल हवा, श्री अनिलजी पतंगे, श्री प्रमोद गुडे , श्री धनंजय हाके,
Previous Post Next Post