Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या


मुंबई । प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. देसाई यांनी त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओ मध्ये देसाई यांचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. देसाई यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नसून या घटनेमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का पोहोचला आहे. (Nitin Desai Passed Away)

लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, यासारख्या अनेक चित्रपटांना आपल्या कलादिग्दर्शनाचा साज देसाई यांनी चढवला होता. आपली कलेमुळे त्यांचं सिनेसृष्टीत एक वेगळं नाव बनलं होतं.नितीन देसाई यांच्या कंपनीने, ND's Art World Pvt Ltd ने 2016 आणि 2018 मध्ये ECL फायनान्सकडून दोन कर्जाद्वारे ₹ 185 कोटी कर्ज घेतले होते आणि जानेवारी 2020 पासून परतफेडीच्या अडचणी सुरू झाल्या असल्याचे सांगीतले जात आहे.देसाई यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचा न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
Previous Post Next Post