जिल्हाधिकारी यांचा शिवभोजन चालकातर्फे सत्कार
लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासना अंतर्गत येथील भक्ती-शक्ती मंगल कार्यालयात दि. १ आॅगस्ट रोजी आयोजित महसूल सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात लातूर शहरातील शिवभोजन चालकांच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांचा सत्कार करण्यात आला.
महसूल सप्ताहाच्या उद्घाटना प्रसंगी आयोजित कार्यक्रमात शिवभोजनासंदर्भात स्टॉल लावण्यात आला होता. जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी भेट दिली त्यावेळी शिवभोज चालक अविनाश बट्टेवार, अफसर शेख, प्रविण कांबळे, प्रदीप अजनीकर, यशवंत जनवाडकर, महादेव घोडके यांनी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकुर यांचा सत्कार केला.
या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, लातूर जिल्हा पुरवठा प्रियंका कांबळे, तहसीलदार गणेश सरवदे, नायब तहसीलदार कुलदीप देशमुख, उगले, गणेश अंबर. सुरज कोटेचा, भुषण चौरे, हकिम शेख, विशाल कापसे, रंजना कांबळे, संगिता कांबळे, जिवन सुरवसे, राजु थोंटे, दीपक राठोड, अकबर शेख, आंनद सुरवसे, रऊफ शेख आदी उपस्थित होते.