गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जिल्हाधिकारी कार्यालयामधील पुनर्वसन विभागातील तलाठी केरबा गोविंद शिंदे लाचलुचपत विभागाच्या जाळयात
लातूर शहरामधील जिल्हाधिकारी कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालले असुन २२करोड रुपयाचा भ्रष्टाचार प्रकरणी एक जण जेल ची हवा खात असताना आता चुलत बहिणीच्या नावावर असलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आजीच्या शपथपत्राच्याआधारे तक्रारदाराचे नावाने करून दिल्याचा मोबदला म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील, पुनर्वसन विभागातील तलाठी केरबा गोविंद शिंदे यांनी 2,000/- रुपये लाच घेतल्याप्रकरणी लातूर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे . हि भ्रष्टाचाराची किड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये थांबण्याचे नाव घेत नसुन यावर आता नजर ठेवण्यासाठी लाचलुचपत विभागाने कंबर कसली आहे.गोरगरिबांच्या पैशावर नजर ठेवणार्या अधिकारी, कर्मचारी यांना वेळीच ठेचणे काळाची गरज बनली असुन भ्रष्टाचाराने बरबटलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निगरगट्ट अधिकारी व कर्मचारी यावर अंकुश लावण्यात मागील जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांना अपयश आल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत असून यावर आता नुतन जिल्हाधिकारी नेमके काय भुमिका घेतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लातूर-लातूर शहरामधील जिल्हाधिकारी कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालले असुन २२करोड रुपयाचा भ्रष्टाचार प्रकरणी एक जण जेल ची हवा खात असताना आता चुलत बहिणीच्या नावावर असलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आजीच्या शपथपत्राच्याआधारे तक्रारदाराचे नावाने करून दिल्याचा मोबदला म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील, पुनर्वसन विभागातील तलाठी केरबा गोविंद शिंदे यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम 2,000/- रुपये घेतल्याप्रकरणी लातूर लाचलुचपत विभागाने गुरुवार दि३ऑगस्ट रोजी रंगेहाथ पकडले आहे . हि भ्रष्टाचाराची किड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये थांबण्याचे नाव घेत नसुन यावर आता नजर ठेवण्यासाठी लाचलुचपत विभागाने कंबर कसली आहे.गोरगरिबांच्या पैशावर नजर ठेवणार्या अधिकारी, कर्मचारी यांना वेळीच ठेचणे काळाची गरज बनली असुन यावर नुतन जिल्हाधिकारी नेमके काय भुमिका घेतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे
मिळालेल्या माहिती नुसार चुलत बहिणीच्या नावावर असलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आजीच्या शपथपत्राच्याआधारे तक्रारदाराचे नावाने करून दिल्याचा मोबदला म्हणून आरोपी शिंदे यांनी पंचासमक्ष तक्रारदारास सुरुवातीस 5,000/- रुपयाची व तडजोडी अंती 2,000/- रुपये लाचेची मागणी केली.
थोड्याच वेळाने तक्रारदार हे आरोपी लोकसेवक शिंदे यांना लाचेची रक्कम 2,000/- रुपये देण्यासाठी पुनर्वसन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेले असता आलोसे शिंदे यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम 2,000/- रुपये स्विकारली.
आरोपीस लागलीच लाचेच्या रक्कमेसह पकडण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन जि.लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
➡ *मार्गदर्शक:-*
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
(मो.नं.09623999944)
➡ *पर्यवेक्षण अधिकारी :-*
पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर
(मो.नं.09309348184)
➡ *सापळा अधिकारी व पथक :-*
भास्कर पुल्ली, पोलीस निरिक्षक
व टीम अँटी करप्शन ब्यूरो, लातूर.
➡ *तपास अधिकारी :-*
भास्कर पुल्ली, पोलीस निरिक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर.
-------------------------------------------------
*लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर कार्यालय दुरध्वनी - *02382-242674*
@ टोल फ्रि क्रं. 1064