Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलनास जिल्ह्यातील पत्रकारांची उपस्थिति

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलनास जिल्ह्यातील पत्रकारांची उपस्थिति 
जिल्हाधिकारी/पोलिस अधिक्षक/जिल्हा माहिती अधिकारी यांना दिले निवेदन 
....................................






लातूर / प्रतिनिधी
पत्रकारितेत दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधीक्षक कृती कार्ड देण्यात यावे, प्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासह विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने मंगळवारी (दि. २९) सकाळी ११ ते १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील व पोलीस प्रशासनाला देण्यात आले.
ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. (जसे की बार कौन्सिल वकिलांना वकिली करण्याचा अधिकृत परवाना देते तसे पत्रकार असल्याचा अधिकृत परवाना मिळावा.)
राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे. तो प्रकार थांबून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात. सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत. तसा शासन निर्णय काढावा. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार, त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी. याबाबत सरकारने आपल्याकडे जी माहिती मागविली आहे ती तातडीने द्यावी. 
माहिती महासंचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत, ते देण्यात यावे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये करू, अशी घोषणा केली होती. टीव्ही, रेडियोआणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली, या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा.
अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. त्याबाबत कमिटी नेमून ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत, ते मार्गी लावावेत. सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातींबाबत पॉलिसी बनवावी.
सोशल मीडियालाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत, अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात. सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी. या मागण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बालाजी फड, जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा सरचिटणीस संगम कोटलवार, टेलिव्हिजन विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष निशांत भद्रेश्वर, टेलिव्हिजन विभागाचे प्रदेश संघटक दीपरत्न निलंगेकर, साप्ताहिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वामन पाठक, डिजिटल विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सितम सोनवणे, साप्ताहिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विष्णू अष्टेकर, संघटक सचिन चांडक, योगीराज पिसाळ, कोषाध्यक्ष श्रीराम जाधव, लातूर तालुकाध्यक्ष प्रभाकर शिरुरे, तालुका सचिव दिलीप मुनाळे, वैभव पुरी, तालुका उपाध्यक्ष खंडेराव देडे आदी पदाधिकरी उपस्थित होते.

चाकूर येथे धरणे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले .................................


 *पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सरकार आणि प्रशासन यांना जाब विचारण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले
*त्या पार्श्वभूमीवर चाकूर तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने मंगळवारी २९ऑगस्ट रोजी तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांना पञकारांच्या विविध मागण्यांसाठी धरणे धरुन निवेदन देण्यात आले.

*यावेळी व्हाईस आँफ मीडियाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष विनोद निला,कार्याध्यक्ष प्रशांत शेटे,सचिव संग्राम वाघमारे,उपाध्यक्ष माधव तरगुडे,राजकुमार जगताप,सहसरचिटणीस संजय पाटील,कोषाध्यक्ष दत्ताञय बेंबडे,कार्यवाहक सुधाकर हेमनर,सदस्य दिपक पाटील,विकास स्वामी,संगमेश्वर जनगावे,सदाशीव मोरे,शिवाजी बरचे,माधव वाघ,सतिष गाडेकर,नवनाथ डिगोळे,लक्ष्मीकांत मोरे आदीसह तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी आणि पञकार बांधव ( मुद्रित माध्यम/ इलेक्ट्रॉनिक माध्यम) उपस्थित होते.


निलंगा येथे धरणे आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले


रेणापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले


Previous Post Next Post