Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पुण्यात‘एटीएस’कडून पाचव्या आरोपीला अटक

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पुण्यात‘एटीएस’कडून  पाचव्या आरोपीला अटक

महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी




पुणे – कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवादीविरोधी पथकाने(एटीएस) मंगळवारी (ता. १) आणखी एका आरोपीला अटक केली. या प्रकरणात यापूर्वी चारजणांना अटक करण्यात आली आहे.

झुल्फिकार अली बडोदावाला (रा. पडघा, ठाणे) असे अटक केलेल्या पाचव्या आरोपीचे नाव आहे. तो राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत होता. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. मध्य प्रदेशच्या रतलाममधील मूळ रहिवासी असलेले हे दोघे जयपूर बॉम्बस्फोट कटातील फरार आरोपी आहेत.

‘एटीएस’ने यापूर्वी दहशतवाद्यांच्या कोंढव्यातील घरातून ड्रोन, संवेदनशील स्थळांची छायाचित्रे आणि लॅपटॉमधून पाचशे जीबी डेटा हस्तगत केला होता. त्यानंतर ‘एटीएस’ने तपासादरम्यान दोन दहशतवाद्यांकडून बॉम्ब तयार करण्याचे रसायन आणि प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त केली आहेत.
दहशतवाद्यांना आश्रय देणा-या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) आणि आर्थिक रसद पुरविणा-या सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. कोंढवा) या दोघांना अटक केली होती. त्यानंतर आता झुल्फिकार बडोदावाला याला अटक झाली आहे.

पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे इसिस ‘कनेक्शन’? 
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २८ जून २०२३ रोजी इसिस दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर कारवाया केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक केली होती. त्यात झुल्फिकार अली बडोदावाला याचा समावेश होता.‘एनआयए’ने महाराष्ट्र इसिस मॉड्यूलप्रकरणी डॉ. अदनान अली सरकार याला कोंढव्यातून नुकतीच अटक केली होती. झुल्फिकार हा अदनान अली याचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून पुण्यात पकडलेले दहशतवादी आणि इसिसचे ‘कनेक्शन’ असल्याचा संशय बळावला आहे.
Previous Post Next Post