गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
छत्रपति शिवाजी चौकामध्ये 'चिट्टी' मटक्याचा धुमाकुळ ! पोलिस प्रशासनाचे मात्र होतेय डोळे झाक!
लातूर/ प्रतिनिधि
छत्रपति शिवाजी चौकामध्ये लातूर शहरातील विविध भागांमध्ये काम करण्यासाठी कामगार थांबलेले असतात.या गोरगरिब कामगारांना हा 'मस्तवाल'मटकेवाला भर छत्रपति शिवाजी चौकामध्ये चहा च्या हाॅटेलच्या आड दोन बाय दोन च्या जागेत खुल्लम खुल्ला दिवसाढवळ्या 'चिट्टी' मटका टेबल टाकून लुटले जात असून यावर स्थानिक पोलीस प्रशासन यांची खास मेहरे नजर आहे की काय ?असा प्रश्न आता सर्वसामान्यातून विचारला जाऊ लागला आहे.विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.पोलीस स्टेशनच्या शेजारी कल्याण, मिलनडे यासह इतर मटका या जुगाराची दुकाने सर्रास खुलेआम उघडून हा गोरख धंदा केला जात असून लाखोंरुपये गोऴा केले जात आहेत. यामुळे शहरातील सलोख्याचे वातावरणात विष कालवण्याचे काम होत आहे. युवापिढी व्यसनाधिन होत असल्याने भांडण तंटे वाढले यासह अनेकांचे संसार उद्धस्त होण्याच्या घटना वाढत आहेत. दिवसा ढवळया 'चिट्टी' देवून मटका खेळण्याचे प्रमाण वाढत आहे.यावर मात्र आता आळा बसत नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांची मक्तेदारी वाढली आहे.यावर आता स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस निरिक्षक मिरकले यांनी कार्यवाही करुन अशा 'चिट्टी'घेवून मटका घेणार्यावर लगाम लावणे अवश्यक बनले आहे.