लातूर जिल्हा वकील मंडळ आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
____________________लातूर, दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने विधिज्ञाच्या विशेष गुण प्राप्त पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड महेश बामणकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर, महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अँड अण्णाराव पाटील, जिल्हा सरकारी अभियोक्ता संतोष देशपांडे व न्यायाधीश वर्ग उपस्थित होते.
गुणगौरव सोहळयात विधीज्ञ व गुणवंत पाल्यांनचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर, अँड अण्णाराव पाटील यांची समोचित भाषणे झाली तर अध्यक्षीय समारोप अँड महेश बामणकर यांनी केले आहे. शेलापागोटे वाचन अँड विजय जाधव,अँड राजेंद्र काळे, अँड मनोज जाधव यांनी केले आहे या मनोरंजनात्मक कार्यक्रमास मोठया प्रमाणात विधिज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमांचे प्रास्ताविक सचिव अँड प्रदिपसिंह गंगणे यांनी केले , सुत्र संचालन व आभार सहसचिव अँड गोपाळ बुरबुरे यांनी मानले आहे, कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अँड गजानन चाकूरकर, अँड संतोष सोनी, अँड कैलाश मस्के, अँड मंगेश राठोड, अँड सलिम डावकरे, श्री प्रकाश मसलगे, श्री सुशील सुर्यवंशी, श्री विष्णू जाधव यांनी परिश्रम घेतले आहेत