Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

श्रीगणेश विसर्जन मिरवणुकानिमीत्त दिनांक 28/09/2023 रोजी वाहतुक मार्गात बदल.

श्रीगणेश विसर्जन मिरवणुकानिमीत्त दिनांक 28/09/2023 रोजी वाहतुक मार्गात बदल.

 


         लातूर/प्रतिनिधी: श्री.गणेश विसर्जननिमित्त लातुर शहरात दिनांक 28/09/2023 रोजी मोठया प्रमाणात विविध गणेश मंडळातर्फे वाजत गाजत मिरवणुका काढण्‍यात येतात, त्यामुळे जनतेच्या सोईच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने लातूर शहरातील खालील मार्गावर वाहतुक बंद करणे व वाहतुक वळविणे आवश्यक आहे.

 

दिनांक 28/09/2023 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 23.50 वाजेपर्यंत वाहतुकीस बंद असणारे मार्ग

Ø पी.व्ही.आर चौक ते दयानंद गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशोक हॉटेल, गांधी चौक, हनुमान चौक, गंजगोलाई पर्यंतचा मार्ग

Ø छत्रपती शिवाजी महाराज चौक, आदर्श कॉलनी, राजीव गांधी चौक ते बांधकाम भवन पर्यंतचा मार्ग 

Ø विवेकानंद चौक ते शाहु चौक, गंजगोलाई, सुभाष चौक, दयाराम रोडने खडक हनुमान, पटेल चौक, सिद्धेश्वर चौक या मार्गे सिद्धेश्वर मंदीर पर्यंतचा मार्ग.

सदरचे रोड हे सर्व प्रकारच्या वाहनांना (मोटार सायकल, थ्री व्हीलर, एस.टी.बसेस, ट्रक, टॅम्पो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर इ.) वाहतुकीसाठी बंद करण्यात यावेत.

 

दिनांक 28/09/2023 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 23.50 वाजेपर्यंत पर्यायी मार्ग:

Ø पी.व्ही.आर चौकातुन शिवाजी चौक व शहरात येणारे एस.टी.बसेस पी.व्ही.आर.चौकातुन रिंगरोडने नवीन रेणापुर नाका मार्गे जुना रेणापुर नाका येथिल बसस्टॅन्डचा वापर करतील.बाकी सर्व वाहने जुना रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडचा वापर करतील.

Ø औसा रोडने शहरात येणा¬¬या एस.टी.बसेस या वाडा हॉटेल येथून रिंग रोडने, खाडगाव टी पॉर्इंट, पिव्हिआर चौक, रेल्वे स्टेशन चौक, नविन रेणापूर नाका मार्गे जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र 2 चा वापर करतील. तसेच चार चाकी,तीन चाकी व दोन चाकी वाहने जुना औसा रोड एल.आय.सी.कॉलनी,नाईक चौक,सुतमील रोड या मार्गाचा वापर करतील.

Ø रेणापुर रोडने शहरात येणा¬¬या एस.टी.बसेस जुना रेणापुर नाका येथील बसस्थानकाचाच वापर करतील. रेणापुर रोडने येणारी चार चाकी,तीन चाकी व दोन चाकी वाहने ही जुना रेणापुर नाका बालाजी मंदीर व खोरी गल्ली या मार्गाचा वापर करतील.

 

 

Ø गंजगोलाई-सुभाष चौक-दयाराम रोड मार्गे-खडक हनुमान-सिध्देश्वर मंदिर या मिरवणुक मार्गावर सर्व वाहनास सदरचा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Ø नांदेड रोडने शहरात येणा¬या एस.टी.बसेस या गरुड चौक, सिद्धेश्वर चौक, नविन रेणापुर नाका मार्गे जुना रेणापुर नाका येथिल बसस्थानकाचा वापर करतील.

 

दिनांक 28/09/2023 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 23.50 वाजेपर्यंत अंतर्गत वाहतुकीसाठी मार्ग:

 

Ø राजस्थान विद्यालय ते दयानंद गेट या पॅरलल रोडचा मार्ग

Ø महात्‍मा गांधी चौक ते महात्‍मा बस्वेश्वर महाविद्यालय - रमा चित्रपटगृह – खोरी गल्ली – शिवनेरी लॉजपर्यंतचा मार्ग.

Ø जुना रेणापुर नाका बसस्थानक येथे येणा¬या व जाणा¬या सर्व बसेस परत त्याच मार्गे रिंग रोडने जातील.

 

      तरी सर्व नागरीकानी उक्‍त आदेशाप्रमाणे वाहतुकीसाठी बंद असल्‍याचे घोषित करण्‍यात आलेल्‍या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करुन महानगरपालिका व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.
Previous Post Next Post