गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
एनआयएकडून नांदेड पोलिसांना अलर्ट;४3 गँगस्टरची यादी जाहीर करून केले सतर्क राहण्याचे अवाहन
हॉटेल, लॉज मालकांनी नोंदी ठेवून दक्षता घेण्याचे नांदेड पोलिसांचे आवाहन
यामध्ये लॉरेन्स बिष्णोई, जसदीपसिंघ, काला जठेरी ऊर्फ संदीप, वीरेंदर प्रताप ऊर्फ काला राणा, जोगिंदरसिंघ, राजेश कुमार ऊर्फ राजू मोठा, राज कुमार ऊर्फ राजू बिसोदीया, अनिल चिप्पी, मोहम्मद शहबाज, गोल्डी बरार अन्सारी, सचिन थापन बिष्णोई, अनमोल बिष्णोई, विक्रमजीतसिंघ ऊर्फ विक्रम ब्रार, डरमनसिंघ ऊर्फ डरमनलोट खालोन, अर्शदीपसिंघ गिल, सुरेंदरसिंघ ऊर्फ चिक्कू, दिलीपकुमार ऊर्फ भोला, प्रवीण वाघवा ऊर्फ प्रिंस, युद्धवीरसिंघ, विकाससिंघ, लखबीरसिंघ ऊर्फ लांडा, गौरव पटीयाल ऊर्फ सौरव्ह ठाकूर, सुखप्रीतसिंघ ऊर्फ बुडा, अमित डागर, कौशल चौधरी, असिफ खान, नवीद डबास ऊर्फ नवीन बाली, छोटूराम ऊर्फ भट, जगसीरसिंघ ऊर्फ जग्गा, सुनील आलवन ऊर्फ टिल्लू ताजपुरीया, भूपिंदरसिंघ ऊर्फ भुप्पी राणा, संदीप ऊर्फ बांदर, सुखडोल सिंघ, गुरूपिंदर सिंघ, निराय ऊर्फ पंडित, दलेरसिंघ, दिनेश शर्मा, मनप्रीतसिंघ टिटू, हरप्रीत, लखवीरसिंघ, इरफान ऊर्फ चन्नू पहेलवान, सन्नी डागर या ४३ जणांचा समावेश आहे.
नांदेड : एनआयएन अर्थात राष्ट्रीय तपास
यंत्रणेने नुकतीच फरार असलेल्या ४३ कुख्यात गैंगस्टरची यादी जाहीर करून नांदेड पोलिसांना अलर्ट केलेले आहे. नांदेड शहरात देश-विदेशातील हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. यामध्ये हे गँगस्टर आपली ओळख लपवून आश्रय घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नांदेड पोलिसानी शहर व जिल्हयातील हॉटेल, लॉज मालकांनी दक्षता घेण्याचे आणि शासनमान्य ओळखपत्रांची चौकशी व शहानिशा करून पूर्ण खात्री पटल्यानंतरच त्यांना आश्रय द्यावा, असे आवाहन केले आहे.
पोलिसांच्या मते, एनआयएन अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने नुकतीच ४३ गँगस्टरची यादी जाहीर केली आहे. हे सर्वजण फरार आहेत. एनआयएने त्यांच्यावर मोठे बक्षीस जाहीर केलेले आहे. हे गँगस्टर भारतातील कोणत्याही शहरात राज्यात तसेच अन्य देशांत आश्रय घेण्याची शक्यता आहे. नांदेड शहरात शीख समाजाचे दहावे गुरू श्री गुरू गोविंदसिंघजी यांची समाधी असल्याने देश-विदेशातील हजारो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे संशयित व जाहीर केलेले गँगस्टर आपली ओळख लपवून नांदेड जिल्ह्यात व शहरात आश्रय घेण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने नांदेड शहर व जिल्ह्यातील हॉटेल, लॉज, ढाबे, यात्री निवास, डेरे, सराय, आश्रमशाळा तसेच भाडेकरूंसाठी खासगी निवासस्थाने पुरविणारे या ठिकाणी आपली ओळख लपवून आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता कुठल्याही अनोळखी व्यक्तीस त्यांची पूर्णतः ओळख पटवून जसे आधार कार्ड, मतदान कार्ड व इतर शासनमान्य ओळखपत्रांची चौकशी व
शहानिशा करून पूर्ण खात्री पटल्यानंतरच त्यांना आश्रय द्यावा. तसेच लॉज व हॉटेल चालकांनी त्यांच्या राहण्याबाबतच्या आवश्यक त्या सर्व नोंदी रजिस्टरला ओळखपत्रासह घेऊन अद्ययावत ठेवावी. त्याची पूर्ण माहिती संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी. तसेच संशयित व्यक्ती अगर वस्तू निदर्शनास आल्यास डायल ११२, पोलीस नियंत्रण कक्षाला तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले
कुख्यात गँगस्टरची यादी