गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गोंधळ;जालन्यात पोलिसांचा लाठीमार; झटापटीत पोलिसांसह अनेक जखमी
अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. आंदोलनस्थळी दगडफेक झाली त्यानंतर पोलिसांनी हवेतगोळीबार करण्यात आला.गेल्या २९ ऑगस्टपासून मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण त्याला विरोध झाल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर आंदोलकांनी दगडफेक केली गेली. त्यानंतर आक्रमक आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
जालन्यातील शहागड येथे पोलिसांनी मराठा आंदोलकांनावर पोलिसांनी लाठीमार केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलिसांकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आरोप, आंदोलनकर्त्यांनी केला आहे असून
जन आक्रोश आंदोलनानंतरही राज्य सरकराने आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्याने दोन दिवसांपासून जालन्यात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळल्यानंतर पोलिस त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली. याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही लाठीमार व अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे या दगडफेकित काही आंदोलन कर्ते आणि काही पोलिसासहवाय एस पी सुनिल सांगळे जखमी झाले असल्याचे समोर आले आहे.
नागरिकांनी कायदा सुव्यवस्था राखावा
लाठीचार्ज करणे दुर्देवी आहे,उपोषण करणार्या ला हाॅस्पीटल मध्ये हलवताना गोंधळ उडाला त्यामुळे हा गोंधळ उडाला,याबाबत समिती स्थापन करुन उच्चस्तरीय चौकशी करणार असुन ,नागरिकांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगीतले अशी प्रतिक्रिया देण्यात आली
जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांनी केले आहे. या लाठीमारातील जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
जालन्यात आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
- मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्टला संभाजीनगर-सोलापूर महामार्गावर मोर्चा.
- जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मराठा समजाच्या आंदोलकांनी आमारण उपोषणाला सुरुवात केली होती.
- उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता.
मराठा आंदोलनाला हिंसक वळण, मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
- मुख्यमंत्र्यांनी मनोजर जरांगे यांच्याकडे आमारण उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.
- मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते.
- उपोषणाच्या चौथ्या दिवशी १ सप्टेंबरला म्हणजे आज २२ गावांनी कडकडीत बंद पुकारला होता.
: मराठा आरक्षण आंदोलन पेटलं; जालन्यात आंदोलकांनी बस पेटवली
- आमरण उपोषणाला बसलेल्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
- आंदोलनकर्त्यांनी विरोध करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली. याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनाही लाठीचार्ज आणि अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
- आंदोलक आणि पोलिसांच्या झटापटीमध्ये ८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. जखमींमध्ये महिला आंदोलकांचा देखील समावेश आहे.
- या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.