Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दयानंद शिक्षण संस्थेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर अन्याय;अनुकंपा तत्त्वावर कामावर घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
दयानंद शिक्षण संस्थेत मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर अन्याय;अनुकंपा तत्त्वावर कामावर घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण



लातूर - महाराष्ट्रसह देश पातळीवर शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दयानंद शिक्षण संस्थेचे नाव सर्वजण आदराने घेत असतात परंतु काही दिवसापासून त्या शिक्षण संस्थेत जातीय राजकारण होते की काय असेच म्हणावे लागेल.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयानंद शिक्षण संस्थेत भेट दिली असता त्यावेळी त्या निमंत्रण पत्रिकेवर मागासवर्गीय खासदार असलेले जयवंतराव आवळे यांचे साधे नावही घेतले नव्हते.त्यामुळे त्याही वेळेस समाज बांधवांनी कॉलेज समोर गोंधळ घातला होता.
    दयानंद विज्ञान महाविद्यालयात वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर मुलाला म्हणजेच सुभाष साठे यांना सेवक पदावर घेतो म्हणून संस्थेने तब्बल नव वर्षे त्याला विनाअनुदानित तत्त्वावर काम करून घेतले आहे.दयानंद विज्ञान महाविद्यालयात सेवक म्हणून काम करत असलेले मागासवर्गीय सुभाष साठे यांना नाले काम कर, शौचालय साफ करून घे, असे काम प्राचार्य दरगड यांनी वेळोवेळी सांगितल्याने अनेक वेळा त्यांच्यात बाचाबाची झाली प्राचार्यांनी त्यांना नोटीसाही दिल्या. यामुळे वाद विकोपाला गेला व एका दिवशी तू उद्यापासून कॉलेजला कामाला येऊ नको असे प्राचार्य यांनी साठे यांना सांगितले.साठे हे लोकशाही मार्गाने न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या लेकरा, बायकोस अमरण उपोषण करत आहेत.अमरण उपोषणाचा आज नववा दिवस.गेले काही दिवसात उन्हाचा किंवा पावसाचा न विचार करता ते उपोषण करत असल्यामुळे त्यांची आज तब्येत खूप खालावली आहे,ही बातमी वाऱ्यासारखी शहरात व जिल्ह्यात पसरल्यामुळे विविध संघटनांचे प्रमुख यांनी साठे यांना विचारणा केले असता कॉलेजच्या एकाही प्रतिनिधींनी मला या ठिकाणी भेटायला आले नाहीत. त्यामुळे या सर्व प्रमुखांनी कॉलेजच्या प्राचार्यांना भेटून ताबडतोब या उपोषण सोडा व दोन दिवसात याचा निकाल लावा अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कॉलेज समोर लातूर जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी प्राचार्यांना देण्यात आला.
    यावेळी बसवंत आप्पा उबाळे, यु .डी.गायकवाड, बालाजी कांबळे, रघुनाथ बनसोडे, नरसिंग घोडके, विकास कांबळे, अशोक देडे, दिवेकर सर,नारायण कांबळे, पिराजी साठे, अंगद वाघमारे,नागनाथ डोंगरे ,आनंद वैरागे आदी विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.
Previous Post Next Post