सारोळा गावच्या सरपंचाने आदर्श निर्माण करत..
भक्ती गोजमगुंडे या त्यांच्या मुलीने फिजोथेरेपी मध्ये यश संपादन केल्या बद्दल 'मांझ घर' या निवासी शाळेत विद्यार्थ्यांसोबत साजरा केला आनंद
लातूर मध्येच नव्हे तर जिल्ह्यात गोजमगुंडे परिवार यांचे नाव सातत्याने नावाजले जात आहे.त्यातच आता
सारोळा गावच्या सरपंच अविष्कार श्रीराम गोजमगुंडे यांनी समाजासमोर आदर्श निर्माण करत
शिक्षणांपासून वंचित असलेल्या मुलांची शाळा "माझं घर"
या शाळेत आपल्या भक्ती गोजमगुंडे या मुलीने फिजोथेरेपी मध्ये यश संपादन केल्या बद्दल 'मांझ घर' या निवासी शाळेत विद्यार्थ्यांसोबत बुधवार दि १३सप्टेंबर रोजी आनंद साजरा केला.यावेळी वडिल अविष्कार श्रीराम गोजमगुंडे आई रोहिणी अविष्कार गोजमगुंडे यांनी मुलगी भक्ती अविष्कार गोजमगुंडे हिचा सत्कार करुन अभिनंदन केले त्यानंतर आशिर्वाद दिले तर पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी विक्रम तात्या गोजमगुंडे, विक्रांत गोजमगुंडे,शैलेश गोजमगुंडे,राजू अकनगीरे,रवि सुडे, प्रमोद गुडे,ज्ञानेश्वर चेवले,आणि समस्त गोजमगुंडे परिवार आणि मित्र परिवार उपस्थित होता.
शिक्षणांपासून वंचित राहणारा समाज डोंबारी ,कलाकेंद्रात काम करणारे तसेच उस तोड कामगार अशा कठिण परिस्थित काम करणार्या पालकांच्या मुलांचे निवासी शाळा लातूर ते औसा जाणर्या हायवे वर कारंजे खड़ी केंद्राजवळ "माझं घर"यानावाने संस्थाचालक शरद झरे आणि संगिता झरे हे स्व खर्चाने चालवत असून .लहान लहान मुले जे गोरगरिब डोंबारी,कलाकेंद्र,उस तोड कामगार अशा परिस्थिति मधून अतिषय दुर्गम भागातून आलेल्या पालकांच्या मुलांना शिक्षण देण्याचे संस्थाचालक शरद झरे व त्यांच्या पत्नी संगीता झरे यांनी केले आहे
.या "माझं घर" या शाळे मध्ये आपला वाढदिवस अशा मुलांच्या सानिध्यात गोजमगुंडे परिवार आने केल्याने नक्कीच त्या लहान लहान मुलांनाही फार आनंद झाला.कुठल्याही शासकीय मदत न घेता हा उपकम चालतो.या शाळेमध्ये पुर्णपणे आकाश कंदील,गणपती मुर्ती अशा प्रकारे पर्यावरण पुरक वस्तु मुले बनवतात
बिड जिल्यातील एका छोट्याशा तांड्यापासून सुरु झालेल्या हा उपकृम असून या ठिकाणी बदामे यांनी आपली जागा निव्वळ एक रुपयाच्या भाडेतत्वावर दिली आहे.संस्थाचालक शरद झरे आणि त्यांच्या पत्नि संगिता झरे हे शेतात काम करुन हि संस्था चालवतात हे विशेष.