लातूरमध्ये धडकलं जलसाक्षरतेचं पांढरं वादळ !लातूरकरांकडून दुचाकी रॅलीचे अभूतपूर्व स्वागत
लातूर/प्रतिनिधी: आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात सुरू असणारे जलसाक्षरता अभियान व दुचाकी रॅली मंगळवारी (दि.२६)लातूर शहरात पोहोचली.पांढरे टी-शर्ट, पांढरी टोपी व पांढरा झेंडा लावलेल्या हजारो दुचाकी यामुळे ही रॅली म्हणजे एक वादळ असावं असा भास झाला.लातूरकर नागरिकांनी या रॅलीचं अभूतपूर्व असं स्वागत केलं.
भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,शैलेश गोजमगुंडे,शंकर शृंगारे,
दीपक मठपती,गणेश गोमसाळे,अजित पाटील कव्हेकर,प्रेरणा होनराव,
देवा गडदे,देवा साळुंके,
पप्पू धोत्रे यांच्यासह शहर भाजपाचे पदाधिकारी आ.निलंगेकर यांच्यासमवेत दुचाकी रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले.
मागील आठ दिवसात पाण्याचे महत्त्व पटवून देत समुद्रात वाहून जाणारे पाणी मांजरा व तेरणा नदीच्या खोऱ्यात सोडावे ही प्रमुख मागणी घेऊन आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा पिंजून काढला. अभियानाच्या शेवटच्या दिवशी ही रॅली लातूर शहरात पोहोचली.सकाळी ९ वाजता गरुड चौकातून शहरातील दुचाकी रॅलीस प्रारंभ झाला.विवेकानंद चौक,शाहू चौक,सम्राट चौक,गुळ मार्केट चौक, मार्केट यार्ड,बसवेश्वर चौक,कन्हेरी चौक,कन्हेरी रोड,सोमाणी शाळा,बौद्ध गार्डन,कोकाटे चौक, ट्युशन एरिया,ठाकरे चौक,मिनी मार्केट,मेन रोड,अशोक हॉटेल,उड्डाण पुलावरून नंदी स्टॉप, आदर्श कॉलनी,राजीव गांधी चौक,सह्याद्री हॉस्पिटल मार्गे जुना औसा रोड,मुंदडा एजन्सीज पासून पुन्हा औसा रोड, शिवाजी चौक,दयानंद गेट, खाडगाव रोड,प्रकाश नगर,संविधान चौक, गिरवलकर मंगल कार्यालय या मार्गे सकाळच्या सत्रात दुचाकी रॅली निघाली.
दुपारी पीव्हीआर चौक,
एमआयडीसी १ नंबर चौक,इंडिया नगर,जुना रेणापूर नाका,अंबा हनुमान चौक,पुण्यश्लोक आहिल्यादेवी चौकातून परत येत रिलायन्स महाविद्यालय,शिवनेरी हॉटेल मार्गे खोरी गल्ली, रमा टॉकीज,बसवेश्वर महाविद्यालय,गांधी चौक, औसा हनुमान,आझाद चौक,सेंट्रल हनुमान,पाप विनाश रोड मार्गे सुळ गल्ली,रामलिंगेश्वर चौक, पटेल चौक,खडक हनुमान,सुभाष चौक व गंजगोलाई मार्गे ही रॅली हनुमान चौकात पोहोचली.
जल्लोषात स्वागत.... लातूरकर नागरिकांनी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वातील दुचाकी रॅलीचे न भूतो न भविष्यती असे स्वागत केले.ठिकठिकाणी दुचाकी रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.विविध भागात महिलांनी आ. निलंगेकर यांचे औक्षण केले.ढोल-ताशांचा गजर सर्वत्र ऐकू येत होता. ट्युशन एरियातील विद्यार्थ्यांनीही रॅलीचे उत्साहात स्वागत केले. अनेक ठिकाणी दुचाकी रॅलीसाठी पायघड्या अंथरल्याचे चित्रही दिसून आले.दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या लातूरकर महिला डोक्यावर पाण्याने भरलेले कलश घेऊन सहभागी झाल्या.