गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पंजाबमध्ये अकाली दलाचे नेते सुरजीत सिंह यांची गोळ्या झाडून हत्या
पंजाबमधील मेघोवाल गंजियान गावचे माजी सरपंच आणि स्थानिक शिरोमणी अकाली दल (एसएडी) सुरजित सिंग यांची गुरुवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली, . सिंह हे त्यांच्या काही मित्रांसोबत गावात बसले असताना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला. सिंग यांना तातडीने रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Tags:
Crime News