Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

उपमुख्यमंत्री अजितदादा आणि महायुतीत धुसपूस?

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
उपमुख्यमंत्री अजितदादा आणि महायुतीत धुसपूस?


मराठा समाजाच्या आंदोलकांवर जालन्यातील अंतरवाली सराटी गावात काल मोठा लाठीमार केल्याच्या घटनेवरुन महायुतीत धुसपूस सुरु झाल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, लाठीहल्ल्याच्या घटनेने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाराज असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अजितदादा यांनी २ दिवसांचे नियोजित तीन कार्यक्रम कार्यक्रम रद्द केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. पुणे, पिंपरी आणि बुलडाणा येथील कार्यक्रम रद्द करण्यात आले. याशिवाय शासन आपल्या दारी या कार्यक्रमातही अजितदादा गैरहजर राहिले. सध्या सुरु असलेल्या या चर्चांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. अजितदादा आज मुख्यंमत्र्यांसोबत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, अचानक त्यांनी आपला दौरा रद्द केला. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा यांचे काल आणि आज असे दोन दिवस कार्यक्रम होते. मात्र, कोणत्याच कार्यक्रमांना जाणे अजितदादा यांनी टाळले आहे. त्यामुळे अजितदादा दोन दिवसांपासून कुठे आहेत? असा सवाल विचारला जात आहे. परिणामी मराठा आंदोलकांवरील लाठीमार आणि फाईल क्लिअरन्सच्या मुद्द्यावर अजितदादा नाराज आहेत का, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. अजितदादा यांची तब्येत बरी नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर आहेत, त्यामुळे लोक नाराजीच्या चर्चा सुरु करतील. परंतु, तसे अजिबात नाही आमच्यात फेविकॉलचा जोड आहे. आमचे महायुतीचे सरकार खूप मजबूत आहे. घट्ट आहे. या सरकारला कुठेही धोका नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.
Previous Post Next Post