गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग केल्याप्रकरणी एकास शिक्षा
आरोपी महादेव चंदू पवार राहणार कुर्डुवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर याने इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांमध्ये भारतीय दंड संहिता कलम ३५४ ड व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. आरोपी महादेव पवार याचे विरुद्ध बार्शी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर खटल्याच्या सुनावणी वेळी सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित अल्पवयीन मुलीची साक्ष महत्वाची ठरली पीडित मुलीने आरोपी हा तिचा वारंवार पाठलाग करून, मोटरसायकल चा हॉर्न वाजवून तिचा लैंगिक छळ करत असल्याचे साक्षीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सदरच्या खटल्यामध्ये पीडित मुलीची आई, नेत्र साक्षीदार रिक्षाचालक तसेच तपासिक अधिकारी बेद्रे साहेब यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सदरच्या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन दिनांक ३०/०९/२०२३ रोजी बार्शी येथील विशेष सत्र न्यायाधीश श्री जयेंद्र सी. जगदाळे साहेब यांनी आरोपी महादेव चंदू पवार यास दोषी धरून भादवी कलम ३५४ D अन्वये एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे लैंगिक छळ केल्या प्रकरणी दोन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
या खटल्यामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने श्री प्रदीप बोचरे, डी डी देशमुख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोकॉ अतुल पाटील व पोना भाऊराव शेळके यांनी काम पाहिले. तसेच मूळ फिर्यादीतर्फे ॲड आय के शेख व अँड योगेश साठे यांनी काम पाहिले आहे.