पाणी हेच जीवन
वाहत्या पाण्याला चालायला लावूया,
चालणा-या पाण्याला थांबायला लावूया,
आणि थांबलेल्या पाण्याला मुरवायला लावूया - जयाजी पाईकरावं
लातूर : माथ्यापासून पायथ्यापर्यंत वाहून जाणारा पडलेल्या पाऊसाचा प्रत्येक थेंब हा जागोजागी अडवला गेला तर जीवसृष्टी अबाधित राहील. असे प्रतिपादन मराठवाड्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उगम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी पर्यावरण विषयी कार्य करणाऱ्या लातूर मधील सामाजिक संस्थांच्या सहका-यांशी बोलताना व्यक्त केले.
बदलत्या प्ररस्थितीत आपण वेळीच सावध होऊन पर्यावरण संवर्धना सोबत पाण्याबाबत सतर्क होणे गरजेचे आहे. पूर्वी नद्या बारमाही वहात असत, त्या आता सिझनल चार सहा महिने वाहत आहेत. नदी पाण्याची निर्मिती करीत नाही तर ती वाहक आहे. तिला वाहती ठेवण्यासाठी नदी संवर्धनाचे कार्य माथा ते पायथा होने गरजेचे आहे. याचे कार्य शासना सोबत जनतेने हाती घेणे काळाची गरज असल्याचे मत जेष्ठ पर्यावरण तज्ञ उगम फाउंडेशनचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी लातूर येथे व्यक्त केले. विविध सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आजच वेळ आहे पाणी वाचवाल तर वाचाल असेही ते म्हणाले.
लातूर मधील पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या समविचारी सामाजिक संस्थांनी सह्याद्री देवराई, द लातूर संस्कृती, वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर वृक्ष चळवळ, माझं लातूर, निसर्ग प्रतिष्ठान, वृक्ष प्रतिष्ठान, कलापंढरी या सामाजिक संस्थांच्या वतीने जयाजी पाईकराव यांचा सत्कार करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये कळमनुरी तालुक्यात कयाथू आणि आसना नदीच्या खोऱ्यात नैसर्गिक स्थानिक प्रजातीच्या गवताचा अधिवास त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने जतन केला आहे. पवना मारवेल जोंधळी या गवताचा आधिवास जतन केला आहे. या त्यांच्या कार्याची पाहणी करण्यासाठी पर्यावरण विषयक शास्त्रज्ञ श्री माधव गाडगीळ यांनीही कयाथु नदीच्या खोऱ्यात विविध गावांना भेट दिली. आज लातूरहून हिंगोलीला जात असताना श्री जयाची पाईकराव यांचा सत्कार पर्यावरण विषयात कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी केला या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले पाण्याचा प्रत्येक थेंब मुरवायला हवा.
सी सी टी माथ्याजवळ पायथ्याजवळ खोल सीसीटी खूप महत्त्वाची आहे. पाण्याचा थेंब आडवला तर वनस्पती ह्या जगतील टीकतील.
लातूर येथील सह्याद्री देवराई पावसाच्या पाण्यावर यामुळेच यशस्वी झाली आहे , सीसीटी मुळेच स्थानिक प्रजातीचे वृक्ष तेथे टिकले आहेत. अश्या प्रकारचे कार्य सर्व ठिकाणी व्हायला हवे.