गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
सत्तर वर्ष राज करणार्या काँग्रेसची संपत्ती ८०५ कोटी तर दहा वर्ष राज करणार्या भाजपाची संपत्ती ६०४६कोटी
२०२१-२२ मध्ये ८ राष्ट्रीय पक्षांची संपत्ती ८,८२९ कोटी
देशामध्ये तब्बल सत्तर वर्ष भारतीय जनता पार्टी ने भ्रष्टाचार संदर्भात काही लाख करोड रुपयाचे घोटाळे झाले असल्याचे बोंबाबोंब केली,त्यामध्ये किरिट सोमय्या सारख्या नागड्या माणसाला भ्रष्टाचाराची कागपत्रे काढण्यासाठी जुंपले,त्यामध्ये अजित पवार यांच्यावर ७०हजार करोड रुपयाचा सिंचन घोटाळा केल्याचे ट्रक भर कागदपत्रे गोळा केली आणि आता ते भाजप सोबत उपमुख्यमंत्री पदावर आहेत याचा नेमका अर्थ आज सर्वसामान्य नागरिकांना समजला असुन भ्रष्टाचाराच्या नावावर अर्थीक लुट झाल्याचे आता २०२१-२२ मधील निवडणूक सुधारणा घडवण्यास प्रोत्साहन देणारी असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अर्थात (एडिआर) च्या अर्थिक अहवालावरून सर्व सामान्य नागरिकांना वाटू लागले आहे.
या अहवाला नुसार देशातील प्रमुख आठ राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत १,५३२ कोटींची भर पडली असून २०२१-२२ या वर्षात त्यांच्याकडील संपत्ती ८,८२९ कोटी झाल्याचे सोमवारी उजेडात आले आहे. प्रामुख्याने भाजपची २१ तर काँग्रेसची संपत्ती १६ टक्क्यांनी वाढल्याचे प्रकाशझोतात आले आहे.
विशेष म्हणजे सत्तर वर्ष राज करणार्या काँग्रेसची संपत्ती ८०५ कोटी तर दहा वर्ष राज करणार्या भाजपाची संपत्ती ६०४६कोटी झाल्याचे समोर आले आहे.
निवडणूक सुधारणा घडवण्यास प्रोत्साहन देणारी असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अर्थात (एडिआर) ने एक अहवाल सार्वजनिक केला. यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसप, भाकप, माकप, तृणमूल काँग्रेस व नॅशनल पीपल्स पक्ष (एनपीपी) आदी पक्षांकडील संपत्ती व देणग्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षात राष्ट्रीय पक्षाकडील संपत्ती ७२९७ कोटी होती. त्यात वर्ष २०२१-२२ मध्ये १५३२ कोटींची भर पडत ती ८८२९ कोटी झाली आहे. २०२०-२१
मध्ये भाजपची संपत्ती ४९९० कोटी होती. त्यात वर्षभरात २१.१७ टक्क्यांची भर पडत ती ६०४६ झाली. तर, २०२०-२१ मध्ये काँग्रेसची संपत्ती ६९१ कोटी होती. यात वर्षभरात १६ टक्क्यांची वाढ होऊन ती ८०५ कोटी झाल्याचे एडीआरने म्हटले आहे. दरम्यान, २०२१-२२ साली भाजपकडे ६०४६ कोटी, काँग्रेसकडे ८०५ कोटी, तृणमूल काँग्रेसकडे ४५८ कोटींची संपत्ती जमा झाली. बसपच्या संपत्तीत ५.७४ टक्क्यांची घट झाली. ७३२ वरून बसपची संपत्ती ६९० कोटीपर्यंत कमी झाली. याच वेळी २०२१-२२ मध्ये काँग्रेसला सर्वाधिक ४१.९५ कोटी, माकप व भाजपला अनुक्रमे १२ व ५.१७ कोटींच्या देणग्या मिळाल्या, अशी माहिती एडीआरने दिली. २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये पाच राष्ट्रीय पक्षांच्या देणग्या घटल्या आहेत. राष्ट्रीय पक्षांनी रोख किंवा इतर स्वरूपात घेतलेल्या कर्जाचे विवरण दिले नाही.
ED, INCOME TAX,GST सारख्या संस्थांना कामाला लावून नेमके कोणते काम केले ते आता उघड होत आहे.
यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हातात मात्र कटोराच भेटला आहे,शिक्षण,आरोग्य यासारख्या महत्वाच्या विषयावर काहीही न करता फक्त आणि फक्त जातीपातीचे राजकारण करुन मलिदा लाटण्याचे काम होताना दिसत आहे.काॅंग्रेस सारख्या मोठ्यापक्षाने ७०वर्ष राज करुन विकास खुंटवला,लहान सहान कार्यालयामध्ये भ्रष्टाचार बोकाळल्याने सर्वसामान्य जनतेने बदल घडवला
परंतू आता या दोन पक्षामध्ये कोण चांगले हे ओळखणे आता सर्वसामान्य जनतेला कठीण झाले आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का ४०ते ५०टक्यावर येवून पोहचला आहे.याचा अर्थ ५०ते६०टक्के नागरिकांनी मतदानावर पाठ फिरवली आहे.यापुढून निवडणुक ही पक्षातील सदस्या मधूनचं होईल म्हणजे ज्या पक्षाचे सदस्य नोंदणी जास्त त्यापक्षाचे उमेदवार निवडूण येण्याचे प्रमाण पण जास्त असणार आहे.त्यामुळे सर्वच पक्ष आता गावोगाव फिरुन सदस्य नोंदणी वर भर देत आहेत.विशेषत:युवकांना विविध प्रलोभणे देवून या सदस्य नोंदणी मध्ये जास्तीत
जास्त सहभाग नोंदवण्यास भाग पाडत आहेत.यावर सर्वसामान्य नागरिकांनी विचार करुन जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडुन मदतान करणे अवश्यक बनले आहे.