वरवंटीच्या मोरया गणेश मंडळाने तृतिय पंथ्यांच्या हस्ते केली आरती
गणेश मंडळाच्या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा
लातूर / प्रतिनिधी : समाजात अनादी काळापासून दूर्लक्षित घटक म्हणून तृतिय पंथीयांकडे पाहिले जाते. यांना सामाजात ना कोणत्या शुभकार्यात किंवा ना सण उत्सव वा आनंदोत्सवात सहभागी केले जाते. परंतू या रुढी परंपरांना व अनिष्ठ प्रथांना बाजू देत वरवंटी (गावभाग) येथील मोरया गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांना तृतिय पंथ्यांना गणरायाच्या आरतीचा बहुमान देऊन त्यांना सुध्दा इतर माणसांप्रमाणे मान / सन्मानाने वागण्याचा व आनंदोत्सव साजरा करण्याचा अधिकार असल्याची समाजाला जाणिव करुन देणारा कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे.
लातूर तालुक्यातील वरवंटी येथील मोरया गणेश मंडळाने मंगळवार, दि. 19 सप्टेंबर रोजी या परिसरात येणार्या तृतिय पंथ्यांच्या हस्ते गणरायाची आरती करुन एक अनोखा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. यामध्ये तृतिय पंथ्यामध्ये प्रिती माऊली लातूरकर, साक्षीमाऊली लातूरकर, वैष्णवीताई लातूरकर व त्यांच्या अन्य सहकार्यांसमवेत जवळपास 8 ते 9 तृतिय पंथ्यांना यावेळी वरवंटीच्या मोरया गणेश मंडळातील सदस्यांनी यांना आरतीचा बहुमान देऊन एक आनोखा उपक्रम राबविला आहे.
याप्रसंगी गणेश मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष ः आदित्य खोबरे, उपाध्यक्ष ः ऋषिकेश शिंदे, सचिव ः शिवरत्न खोबरे, सहसचिव नागेश माने यांच्यासह सदस्य पवन खोबरे, चैतन्य चिकटे, स्वरुप पाडुळे, यश खोबरे, आजिंक्य माने, यांच्यासह गावातील ज्येष्ठ मान्यवरांमध्ये गावचे तंटामुक्ती अध्यक्ष किरण विजयकुमार खोबरे, माजी सरपंच दिगंबर माने, माजी ग्रा.पं. सदस्य प्रशांत नागनाथ खोबरे, माजी उपसरपंच दिलीप चिकटे, विद्यमान ग्रा.पं. सदस्य रवि शिंदे, घटनेश्वर खोबरे, युवा नेतृत्व ऋषी खोबरे, महादू माने, कुमार चिकटे, भाऊ माने, बानाप्पा लांडगे, लक्ष्मण पाडुळे, ओम माने, राजकुमार खोबरे, रोहित माने आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी तृतिय पंथ्यांना आरतीचा बहुमान दिल्याबद्दल लातूर तालुक्यातील अनेक मान्यवरांकडून मोरया गणेश मंडळ, वरवंटी यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.