Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर येथील सिद्धिविनायक कॉलनीमध्ये सिद्धीविनायक गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना


लातूर येथील सिद्धिविनायक कॉलनीमध्ये सिद्धीविनायक गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना


लातूर:-
 लातूर येथील सिद्धिविनायक कॉलनीमध्ये गणेश चतुर्थी च्या शुभमुहूर्तावर काल मंगळवार दिनांक १९/०९/२०२३ रोजी सिद्धीविनायक कॉलनीतील सर्व नागरिकांच्या पुढाकाराने सिध्दीविनायक गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ही मुर्ती पुर्णतः पाषाणाची असुन अतिशय सुरेख आहे. तसेच येथे लातूर मधील सर्व नागरिकांना सिद्धीविनायक चे दर्शन घेता यावे म्हणून ही मुर्ती येथे कायमस्वरूपी रहाणार आहे. यावर्षी च्या गणेशोत्सवात लातूर मधील जास्तीत जास्त भाविक नागरिकांनी सिध्दीविनायक गणेशाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धीविनायक कॉलनीतील सर्व नागरिकांनी केले आहे. या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी उर्मिला ताई बिराजदार, ऋषीकेश पाटील, योगेश बिराजदार, संतोष हुडगे, अशिश बिराजदार, पंढरी सगर,अशिश येनगले सर, परगे सर, सचिन गुरव, बेलुरे आप्पा, अवि हाक्के, प्रा. राजकुमार जाधव सर , रेड्डी सर, गोरे सर ,हेळंबे सर, राजपूत सर, हंसराज बिराजदार सर, ढोणे मामा, सतिष काळे सर, सतिष शेळके सर, दामोदर बिराजदार, लक्ष्मण खडके सर, वाघमारे साहेब, घोडके मामा, काळे सर, पौळ सर, सचिन गरड , मंदे सर, डॉ. चव्हाण सुधीर, कावळे एन.आर., केंद्रे साहेब, गोरगीले सर, चिलमे सर, मंठाळे साहेब, कराड सर, लामतुरे सर, चाटे सर आदी सह परिसरातील बहुसंख्य नागरिक व महिला उपस्थित होते.
Previous Post Next Post