गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
सिंहगड रोड परिसरात विजय ढूमेवर खुनी हल्ला ;पुणे हादरलं
पुण्यात विजय ढूमे नावाच्या व्यक्तीचा लोखंडी गज आणि फावड्याने सपासप वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. सिंहगड रोड परिसरातील क्वालिटी लॉजजवळ आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
विजय ढूमे हे एका सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे. तसेच त्यांचे अनेक मोठ्या राजकीय व्यक्तींशी चांगले मैत्रीचे संबंध आहेत. मात्र, २८सप्टेंबर रोजी संध्याकाळी सिंहगड रोडवर असणाऱ्या क्वालिटी लॉजमधून बाहेर आल्यावर पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी गज आणि फावड्याने हल्ला चढवला. हल्लेखोर त्यांच्यावर सपासप वार करत राहिले. ढूमे हे रक्तच्या थारोळ्यात पडले होते. मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुढील तपास सिंहगड रोड पोलिसांकडून केला जात आहे