पुण्याजवळील रांजणगाव येथे 'इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर' (EMC) प्रकल्प : तरुणांसाठी होणार रोजगार उपलब्ध
पुणे-
पुण्याजवळील #रांजणगाव येथील राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार 'इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर' (#EMC) प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपये #एमआयडीसी कडे वर्ग केले आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.या प्रकल्पात IFB, LG आणि Gogoro EV Scooter यासारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. यामुळे हा परिसर ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येईल, अधिक उद्योजक, कंपन्या तेथे आकर्षित होऊन त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. EMC कार्यन्वित करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीने विशेष परिश्रम घेतले असून त्यांचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी रांजणगाव येथे २९७.११ एकर जागेवर #इलेक्ट्रॉनिक्स_मॅन्युफॅक्चरिंग_क्लस्टर’ उभारणीस मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी ४९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी २०८ कोटी रुपये केंद्राचा हिस्सा असून यातील पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपये केंद्राने एमआयडीसीकडे वर्ग केले आहेत.