Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

वन मिशन, 100% वोटर रजिस्ट्रेशन’ उपक्रमांतर्गत महाविद्यालयांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबीर

वन मिशन, 100% वोटर रजिस्ट्रेशन’ उपक्रमांतर्गत महाविद्यालयांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबीर

 

लातूर, दि. 18 (जिमाका) : मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 18 ते 19 वर्षे वयोगटातील व्यक्तींची नोंदणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ‘वन मिशन, 100% वोटर रजिस्ट्रेशन’ उपक्रमांची घोषणा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली असून याअंतर्गत 20 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये युवा मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या शिफारसीनुसार 1 जानेवारी 2024 या दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 18 ते 19 वयोगटातील व्यक्तींची मतदार नोंदणी, महिला मतदार नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये 20 ऑक्टोबर रोजी आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरामध्ये जास्तीत जास्त युवा मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत. नाव नोंदणीसाठी येताना आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो आदी कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
Previous Post Next Post