दसरा / नवरात्र देवी मिरवणुक व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमीत्त दिनांक 24/10/2023 रोजी लातूर शहरातील वाहतूक मार्गात बदल...
लातुर शहरात दिनांक 24/10/2023 रोजी नवरात्र उत्सवानिमित्त शहरात विविध नवरात्र महोत्सव मंडळातर्फे देवीच्या वाजत-गाजत मिरवणुका काढण्यात येतात तसेच धम्मचक्र परिवर्तन दिनानिमीत्त बौध्द समाज बांधवाकडूनही शहरातील विविध भागातून मिरवणुका टाऊन हॉल, लातूर येथे येत असतात. त्यामुळे जनतेच्या सोयीच्या व सुरक्षीततेच्या दृष्टीने लातूर शहरातील खालील मार्गावर वाहतुक बंद करणे व पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे.
दिनांक 24/10/2023 रोजी दुपारी 14.00 ते रात्री 23.00 वाजेपर्यंत वाहतुकीस बंद असणारे मार्ग
संविधान चौक ते दयानंद गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशोक हॉटेल मार्गे टाऊन हॉलपर्यंत
विवेकानंद चौक, शाहु चौक, गंजगोलाई, गांधी चौक, मिनी मार्केट मार्गे टाऊन हॉल पर्यंत
इंडिया नगर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, गंजगोलाई, शाहू चौक मार्गे दसरा मैदानपर्यंत
सदरचे रोड हे सर्व प्रकारच्या वाहनांना (मोटार सायकल, थ्री व्हीलर, एस.टी.बसेस, ट्रक, टॅम्पो, टॅक्सी, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर इ.) वाहतुकीसाठी बंद करण्यात यावेत.
दिनांक 24/10/2023 रोजी दुपारी 14.00 ते रात्री 23.00 वाजेपर्यंत पर्यायी मार्ग:
बार्शी रोडवरून शहरात येणारे एस.टी.बसेस ह्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र 2 चा वापर करतील, उर्वरीत सर्व वाहने जुना रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडचा वापर करतील.
औसा रोडने शहरात येणा¬या एस.टी.बसेस या जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र 2 चा वापर करतील, उर्वरीत सर्व वाहने जुना रेल्वे लाईनच्या पॅरलल रोडचा वापर करतील.
रेणापुर रोडने शहरात येणा¬या एस.टी.बसेस जुना रेणापुर नाका येथील बसस्थानकाचाच वापर करतील, रेणापुर रोडने येणारी उर्वरीत चार चाकी, तीन चाकी व दोन चाकी वाहने ही जुना रेणापुर नाका बालाजी मंदीर व खोरी गल्ली या मार्गाचा वापर करतील.
नांदेड रोडने शहरात येणा¬या एस.टी.बसेस या गरुड चौक, सिद्धेश्वर चौक, नविन रेणापुर नाका मार्गे जुना रेणापुर नाका येथिल बसस्थानकाचा वापर करतील.
दिनांक 24/10/2023 रोजी दुपारी 14.00 ते रात्री 23.00 वाजेपर्यंत अंतर्गत वाहतुकीसाठी मार्ग
राजस्थान विद्यालय ते दयानंद गेट या पॅरलल रोडचा गांधी चौक ते बस्वश्वेर महाविद्यालय - रमा चित्रपटगृह – खोरी गल्ली – शिवनेरी लॉज जुना रेणापुर नाका बसस्थानक येथे येणा¬-या व जाणा¬-या सर्व बसेस परत त्याच मार्गे जातील.
तरी सर्व नागरीकानी उक्त आदेशाप्रमाणे वाहतुकीसाठी बंद असल्याचे घोषित करण्यात आलेल्या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करुन महानगरपालिका व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.