Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये वाहनासह तिन किलो गांजा जप्त. 3 जणांन विरोधात गुन्हा दाखल

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये वाहनासह तिन किलो गांजा जप्त. 3 जणांन विरोधात गुन्हा दाखल
दहशतवाद विरोधी शाखा,लातूर व स्थानिक गुन्हे शाखे ची संयुक्त कारवाई




                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने लातूर पोलीसा कडून अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
             दरम्यान पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखा लातूर व दहशतवाद विरोधी शाखा, लातूर च्या संयुक्त पथकाने दिनांक 24/10/2023 रोजी मध्यरात्री गांजाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करीत असलेल्या कार क्रमांक एम एच 24 एडब्ल्यू 9340 कारला गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करून नवीन रेनापुर नाका परिसरात ताब्यात घेऊन कार मधील लोकांना विचारपूस करून कारची झडती घेतली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या खाताच्या पोत्यात गाडीच्या डिग्गी मध्ये लपून ठेवलेले 3.215 किलोग्राम प्रतिबंधित बी मिश्रित गांजा जप्त करण्यात आले आहे.
            पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा,लातूर यांनी पाठलाग करून ताब्यात घेतलेल्या कार मध्ये प्रतिबंधित गांजा आढळून आल्याने तो कारसह जप्त करण्यात आला असून पोलीस ठाणे, विवेकानंद चौक येथे गुन्ह्यातील आरोपी नामे

1) शरीफ लतीफ शेख, वय 35 वर्ष, राहणार कॉईल नगर, लातूर.

2) वसीम बाबूलाल अत्तार, वय 26 वर्ष, राहणार बस स्टॅन्ड जवळ धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड

3) ईश्वर नवनाथ फड, राहणार धर्मापुरी तालुका परळी (फरार)

          यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 637/2023 कलम 8 (क), 20 (ब) 29 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act ) 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून चोरटी विक्री व्यवसायासाठी बी मिश्रित गांजा, वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कार व इतर साहित्य असा एकूण 9 लाख 31 हजार 825 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.
                   पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 24/10/2023 रोजी पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा यांच्या संयुक्त पथकातील पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, सहाय्यक फौजदार उत्तम जाधव, अंगद कोतवाड, पोलीस अमलदार संपत फड, मोहन सुरवसे, नाना भोंग, सचिन धारेकर, सचिन मुंडे, नकुल पाटील, संजय काळे, चंद्रकांत केंद्रे, राहुल सोनकांबळे,पोलीस फोटोग्राफर सुहास जाधव, धनंजय गुट्टे यांनी सदरची कामगिरी केली आहे.
Previous Post Next Post