Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रेणा कारखाना येथे २४ ऑक्टोबर रोजी बॉयलर अग्नी प्रदिपन, 4950 मे.टन गाळप क्षमता विस्तारीकरणासह 18 वा गळीत हंगामाचा शुभारंभ

रेणा कारखाना येथे २४ ऑक्टोबर रोजी बॉयलर अग्नी प्रदिपन, 4950 मे.टन गाळप क्षमता विस्तारीकरणासह 18 वा गळीत हंगामाचा शुभारंभ

सहकार महर्षी मा.श्री. दिलीपरावजी देशमुख, सौ.सुवर्णाताई दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री मा.आ.श्री. अमित विलासरावजी देशमुख, मा.आ.श्री. धिरज विलासरावजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती



*दिलीप नगर निवाडा :-- रेणा सहकारी साखर कारखाना येथे दि.२४ ऑक्टोबर २०२३ रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर गळीत हंगाम २०२३-२४ साठी बॉयलर अग्नी प्रदिपन, 4950 हजार मेट्रिक टन गाळप क्षमता विस्तारीकरणासह व १८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम सकाळी ठीक ११.१५ वाजता कारखाना स्थळावर संपन्न होणार आहे.
माजी मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, मा.सौ.सुवर्णाताई दिलीपरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री मा.आ.श्री. अमित विलासरावजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लातूर ग्रामीणचे आमदार मा.आ.श्री. धिरज विलासरावजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, संत शिरोमणी कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, मांजराचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे,जागृतीचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, २१शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, संत शिरोमणीचे व्हा. चेअरमन शाम भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती शेषेराव हाके याची उपस्थिती असणार आहे.
सदरील कार्यक्रमासा सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, संचालक धनराज देशमुख, संजय हरिदास,चंद्रकांत सुर्यवंशी,संग्राम माटेकर,प्रेमनाथ आकनगिरे, प्रविण पाटील, तानाजी कांबळे, शहाजी हाके, संभाजी रेड्डी, सौ.वैशालीताई माने, अमृताताई देशमुख,लालासाहेब चव्हाण,अनिल कुटवाड,कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांनी केले आहे.
Previous Post Next Post