मराठा आंदोलन पेटले;मराठवाड्यात एसटी सेवा ठप्प, 7 आगारातील 380 बसेसच्या 2800 फेऱ्या रद्द|
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन मराठवाड्यात प्रचंड तापलेले पाहायला मिळत आहे. जालना येथे महिला तहसीलदाराची गाडी फोडण्यात आली आहे. तर, नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याने एसटी सेवा ठप्प, 7 आगारातील 380 बसेसच्या 2800 फेऱ्या रद्द|केल्याची माहिती समोर येत आहे.
“गड्यांनो मला माफ करा, मी…”; क्षीण आवाजात मनोज जरांगे यांचं वक्तव्य, म्हणाले…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केलं. उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांनी पाणी आणि उपचार घेण्याची विनंतीवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.
उपचार घेण्याच्या विनंतीवर क्षीण आवाजात मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केलं. सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी देऊनही निर्णय न झाल्याने जरांगेंनी हा निर्णय घेतला. आज (२९ ऑक्टोबर) उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांनी पाणी आणि उपचार घेण्याच्या विनंतीवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे म्हणाले, “गावातील लोकांच्या चुली पेटत नाहीये आणि तेही जेवण करत नाहीये. तुम्ही पाणी आणि उपचार घ्या, अशी चिट्ठी लिहून मला संदेश देण्यात आला. मी कधीच या गादीला नाही म्हटलेलो नाही. परंतु गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतो आहे.”