गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातुरमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत; तिघांचा गुदमरून मृत्यु
लातूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक एका चार मजली इमारतीच्या तळमजल्यातील दुकानाला शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास अचानक • आग लागली. त्यामुळे निर्माण झालेला प्रचंड धूर इमारतीत पसरला अन् दुसऱ्या मजल्यावर राहणारे तिघे जीव गुदमरून मृत्युमुखी पडले. तर तिघांनी गॅलरीला साडी बांधून खाली उतरत स्वत:चा जीव वाचविला.
सुनील लोंढे (वय ५५), प्रमिला लोंढे (५०), कुसुमबाई लोंढे (८०, रा. लातूर) अशी मयतांची नावे आहेत. लोंढे यांचे शिवाई कॉम्प्लेक्स असून, त्यात सदनिका आहेत.
तिघे बालबाल बचावले
■ तिसऱ्या मजल्यावर बीड येथील एक महिला व त्यांची दोन मुले किरायाने राहतात, जिनाब फातेमा (४५) या घरीच असतात. तर सय्यद अजरा फराज (२२) ही मुलगी 'बीएएमएस'चे शिक्षण घेत आहे.
■ तर सय्यद फहाज (२१) हा नीट परीक्षेची तयारी करीत आहे. शिक्षणासाठी ते येथे आहेत.
■ धुरामुळे इमारतीच्या पायऱ्यांवरून खाली उतरणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर या तिघे गॅलरीला साडी बांधून खाली उतरले आणि आपला जीव वाचविला. या घटनेत तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत.