उन्नती राठी फाउंडेशन कडून लातूर मधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
घेणाऱ्याने घेत जावेघेता घेता एक दिवसदेणाऱ्याचे हातच घ्यावे“
*या पंक्तिला अनुसरून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात पूरणमल शाळेचे शिक्षक मा. भीमजी डुनगावे व मा.पारिकजी यानी परिश्रम घेतले. त्यांना उन्नती राठी फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यात अग्रेसर आहे हे कळताच त्यांनी फाउंडेशन च्या अध्यक्षांची भेट घेवून गणवेशाविषयी अड़चन सांगीतली व क्षणाचाही विचार न करता उन्नती राठी फ़ाउंडेशनच्या अध्यक्षांच्या परवानगीने व संचालकांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यापाठीमागे फाउंडेशनच्या “एक हात मदतीचा” या संकल्पने अंतर्गत मा.नंदकिशोरजी लोया,मा.सचिनजी बांगड़,मा.ॲड.नंदकिशोरजी लोया व मा.विठ्ठलजी राठी यानी विशेष योगदान दिले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जगन्नाथजी राठी (फ़ाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक व उद्योजक )व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने मा.सत्यनारायणजी लड्डा (फ़ाउंडेशनचे आधारस्तंभ व राजस्थानी मल्टीस्टेट आणि बंसल क्लासेस चे संचालक ) हे होते.त्याप्रसंगी उन्नती फाउंडेशनचे अध्यक्ष मा.श्री डॉ. प्रसादजी राठी , उपाध्यक्ष प्रा. डॉ.गोपालजी बाहेती, संचालक मा.विठ्ठलजी राठी , मा.डॉ. विनोदजी लड्डा व फाउंडेशनचे सन्माननीय पदाधिकारी तसेच मा.ॲड.नंदकिशोरजी लोया,मा.गोकुलजी चांडक उपस्थित होते.तसेच शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री संजयजी बियाणी साहेब, शाळेचे मुख्याध्यापक राजाराम काथवटे व सर्व शिक्षक - कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमात सूरज मुळजे यानिही आपले श्रमदान दिले. गणवेश वाटपानांतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मनाला प्रसन्न करणारा व फ़ाउंडेशन योग्य दीशेने वाटचाल करत आहे याचा सर्वाना समाधान झाला.भविष्यात पुन्हा गरज भासल्यास उन्नती राठी फ़ाउंडेशन नेहमी मदतीस राहिल असे आश्वासन मी अध्यक्षांच्या परवानगीने देत आहे असे फाउंडेशन चे उपाध्यक्ष यानी नमुद केले व त्यानंतर मुख्याध्यापकानी मनोगत व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले*