गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अहमदपूर बंदला हिसक वळण लागून बसवर दगडफेक, दुकानाची तोडफोड
अहमदपूर : प्रतिनिधी
सोशल मीडियावर एका माथेफिरुने महिलासंदर्भात अर्वाच्य भाषेत बोलून व्हायरल केलेल्या क्लिपमुळे दलित समाजाने दि १९ रोजी शहर बंदचे आवाहन केले होते. या बंदला हिसक वळण लागून अंदोलकांनी दुकानात घुसून तोडफोड व बसवर दगड मारुन नुकसान केले. या घटनेत एक लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यासंदर्भात अहमदपूर पोलीस ठाणे येथे अनिल शिवाजीराव गोरटे (वय ४४) धंदा व्यापार यश एजन्सीचे मालक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे दुकानात दहा ते बारा लोकांनी घुसून दुकान का उघडलेस म्हणून शिवीगाळ केली व दुकानातील सर्व काचा फोडून आतील सामानाचे नुकसान केले. यात दुकानचे साठ हजाराचे नुकसान केल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच अहमदपूर आगाराचे बस चालक रमेश किशनराव जाधव बस क्रमांक एम एच २०-डीएल १३३६ ही अहमदपूर ते लातूर जात असताना यश एजन्सीच्या समोर दगडफेक केली. यात ५० ते ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. दोन्ही घटनेत एक लाख पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.
सदर घटनेत आरोपी दहा ते बारा असून यातील प्रज्ञांिसह सुनील दहीकांबळे, सचिन शरद लामतुरे, श्रेयस उमाकांत बनसोडे, संकेत महेंद्र ससाने, रोहित शरद कांबळे, आदीत्य अशोक बनसोडे व त्यांच्यासोबत अन्य पाच ते सहा अनोळखी मुलांवर अहमदपूर पोलिसांनी कलम १४३, १४६, १४७, १४८, १४९, ४२७, ३३७-भादवी, १३५ बीपीअॅक्ट (सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४) कलम ३, क्रिमीनल लॉ अमेनमेंट,कलम ७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरिक्षक.सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार के.एस. पठाण हे करीत आहे.