प्रेरणा होनराव यांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण
लातूर ः मुलांच्या बालवयातं त्यांच्यावर संस्कार होणे हे अत्यंत गरजेचे असते म्हणून मागच्या एक वर्षापासून जोशी श्रीनिवास संकुल, सावेवाडी, लातूर येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ.स्वाती योगानंद जोशी यांच्या पुढाकारातून दररोज संध्याकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास राम रक्षा पठण व स्त्रोताचे पठण केले जाते. आजच्या युगामध्ये लहान मुलं मोबाईल, वॉटसअॅप, युट्युबवर जास्तीत जास्त वेळ घालवितांना दिसतात. परंतू मुलांवर अध्यात्मीक संस्कार होणे काळाची गरज असुन आजच्या युवा पिढीला अध्यात्माच्या माध्यमातून संस्कार मिळण्यासाठी सौ.स्वाती योगानंद जोशी या जोशीज् संकुलमधील सर्व लहान चिमुकल्यांकडुन रामरक्षा पठण करून घेत एक सामाजिक व अध्यात्मीक उपक्रम राबवित आहेत.
नवरात्रीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या मिडिया पॅनलिस्ट महाराष्ट्र तथा प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चाच्या प्रेरणा होनराव यांच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा पठण करण्यात आले. यावेळी सौ.स्वाती योगानंद जोशी यांच्या अध्यात्मीक कार्याचे कौतुक करत ते जो उपक्रम राबवीत आहेत तो खरोखरच वाखण्याजोगा असुन अशा प्रकारचा उपक्रम घराघरामध्ये राबविणे काळाची गरज असुन सर्वांनीच आपल्या घरामध्ये रामरक्षा पठण करावे असेही यावेळी प्रेरणाताई होनराव म्हणाल्या.
याप्रसंगी छोटे चिमुकले चि.रूद्र, शौर्य, विराज, समर्थ, विशिष्ट, प्रशांत, प्रतिक, कौस्तुभ, हर्षवर्धन, कु.सानिका, माही, राधा, पुर्वी, ईश्वरी, नेत्रा आदिंनी रक्षा पठाण केले. या चिमुकल्यांच्या रामरक्षा पठाणचे प्रेरणाताई होणराव यांनी कौतुक केले. याप्रसंगी जोशीज् संकुलमधील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक संजय राजूळे, योगानंद जोशी, सौ.श्रध्दा बुद्रे, सौ.भक्ती बुद्रे, सौ.ललीता भोसले, श्रीमती मेघा प्रयाग, श्रीमती लिला कोनार्डे, सौ.मयुरी कुलकर्णी, सौ.सारीका कुलकर्णी, सौ.राधीका कासले, सौ.सावित्री राजुळे यांची यावेळी उपस्थिती होती.