माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लोंढे कुटुंबियांचे केले सांत्वन
आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची
विशेष खबरदारी घेण्याच्या दिल्या सूचना
लातूर प्रतिनिधी : २६.१०.२३
लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फुलाच्या दुकानात गुरुवारी
सकाळी आग लागली, या दुर्दैवी घटनेत वरच्या मजल्यावर राहणारे डॉ.सुनील
शिवाजीराव लोंढे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पत्नी, आई असे तिघांचे
गुदमरून निधन झाले, यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे माजी
वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी
पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. २६ ऑक्टोबर
रोजी दुपारी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. लोंढे कुटूंबियांचे सांत्वन करून
धीर दिला.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील छत्रपती
शिवाजी महाराज चौकानजीक मेन रोड मित्र नगर परिसरात असलेल्या चार मजली
इमारतीच्या तळघरात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत डॉ. सुनील शिवाजीराव
लोंढे, प्रमीला सुनील लोंढे, कुसुम शिवाजीराव लोंढे मृत्यू पावले
त्यांच्या कुटुंबियांची आणि नातेवाईकांची भेट घेऊन, सांत्वन करून त्यांना
धीर दिला. यानंतर या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची विलासराव देशमुख शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, त्यांच्यावर
योग्य उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत. शहरात अशा घटनांची
पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महानगरपालिकेने विशेष खबरदारी घेण्याच्या
सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना माजी मंत्री आमदार देशमुख यांनी यावेळी
दिल्या आहेत.
यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस
कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद
पटेल, व्हाईस चेअरमन विजय देशमुख, माजी नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, विलास
सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन रवींद्र काळे, लातूर शहर युवक
काँग्रेसचे अध्यक्ष इमरान सय्यद, लातूर सोशल मीडिया काँग्रेसचे
जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी आदीसह लोंढे कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित
होते.