Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अमरावती – पुणे रेल्वे दररोज धावणार ;रेल्वे राज्यमंत्री दानवेंची आ. निलंगेकरांना ग्वाही

अमरावती – पुणे रेल्वे दररोज धावणार ;रेल्वे राज्यमंत्री दानवेंची आ. निलंगेकरांना ग्वाही



लातूर प्रतिनिधी : अमरावती – पुणे ही रेल्वे सध्या आठवड्यातून दोन दिवस धावत आहे. सदर रेल्वे दररोज सुरू करण्यात यावी अशी मागणी सातत्याने प्रवाश्यांकडून होत आहे. हि मागणी लक्षात घेऊन माजी. मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला होता, तसेच रेल्वे राज्यमंत्री दानवे पाटील यांची प्रत्यक्षात भेट घेऊन ही रेल्वे दररोज धावणे प्रवाश्यांच्या किती सोयीची आहे हे सांगत अमरावती – पुणे रेल्वे दरारोज सुरू करावे अशी मागणी केली. या बाबत रेल्वे राज्यमंत्री दानवे पाटील यांनी सकारात्मकता दाखवत सदर रेल्वे दररोज धावेल अशी ग्वाही दिली.

            सध्या आठवड्यातून दोन दिवस अमरावती – पुणे (01440) ही रेल्वे धावत आहे. विदर्भ – मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्र या विभागांना जोडणारी व अमरावती, अकोला, वाशीम, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव व पुणे या आठ जिल्हयातून धावत आहे. हि रेल्वे या तिन्ही विभाग व आठ जिल्हयातील विध्यार्थी, व्यापारी व प्रवाशांच्या द्रष्टीकोनातून अतिशय सोयीसकर आहे. या रेल्वे मुळे या आठही जिल्हयातील प्रवाशांच्या वेळेची व आर्थिक बचत करणारी ठरत असून याचा प्रवाशांना मोठा फायदा ही होत आहे, त्यामुळेच हि रेल्वे दररोज सुरु करावी अशी मागणी केवळ लातूरच नव्हे तर या आठही जिल्हयातून सातत्याने होत आहे. या रेल्वेमुळे प्रशासनालाही आर्थिक फायदा होऊ शकतो हि बाब लक्षात घेऊन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमरावती – पुणे ही रेल्वे दररोज सुरु करावी अशी मागणी केली, याबाबत रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची प्रत्यक्षात भेट घेऊन सदर रेल्वे या आठ जिल्यातील प्रवाशांसाठी किती महत्वाची आहे याबाबत सांगीतले.

            रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याशी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी चर्चा केल्यानंतर सदर रेल्वे दररोज सुरु करण्याबाबत सकारात्मकता दाखवलेली आहे, तसेच ही रेल्वे दररोज सुरु करण्यासाठी तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन अमरावती – पुणे ही रेल्वे दररोज सुरु होईल अशी ग्वाही दिली आहे. याबददल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
Previous Post Next Post