Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा बप्पा गणेश मंडळ सर्वोत्कृष्ट, महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार २०२३ जाहीर !

 लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा बप्पा गणेश मंडळ सर्वोत्कृष्ट, महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार २०२३ जाहीर !






 लोकमान्यांनी ज्या हेतूने गणोशोत्सव सुरु केले त्या प्रत्येक हेतूची पुर्तता करताना मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक, आध्यत्मिक, शैक्षणिक आणि आरोग्य या पंचसूत्रीवर आधारित लोकहितासाठी, सामाजिक बांधिलकीसाठी, समाज प्रबोधनासाठी बप्पा गणेश मंडळ मागील ३४ वर्षापासून लातूरचे केंद्रबिंदू असलेल्या गंज गोलाई येथे गणेशोत्सव साजरा करत आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसात अनेक समाज प्रबोधनात्मक जणजागरणातून लातूरकरापर्यंत पोहचण्याचे कार्य अविरत सुरु आहे.   

प्रबोधनपर पथदेखाव्यांसह डॉल्बीविरहीत आणि गुलालमुक्त मिरवणुकीने ध्वनी प्रदुषण टाळलं जातं. इतकंच नाही तर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घेत मंडळ सामाजिक चळवळीला वेग देताना जल पुनर्भरण, शोषखड्ड्यांविषयी जनजागृती अभियान, स्त्रीभ्रूण हत्या टाळाव्यात यासाठी "मुलगी वाचवा" अभियान, अंधश्रद्धा निर्मुलन अभियान, सेंद्रिय शेती जनजागरण अभियान राबविले गेले. तर श्रावण मासातल्या निर्माल्यापासून खत तयार केले, शिवाय सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन उपलब्ध करुन दिली.

विविध लोककलांच्या कार्यक्रमांचे आयोजन यासोबतच खास देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन, ज्यात कुस्ती, मलखांब स्पर्धांचेही आयोजन करुन आपल्या दैदिप्यमान संस्कृतीला जपण्याचा - वाढवण्याचा मंडळाने प्रयत्न केले.

आरोग्याच्या दालनात शिरताना मंडळाने शहरातील वंचित बांधवांच्या वस्त्यांमध्ये फिरते रुग्णालय उपलब्ध करुन दिले. पथनाट्यातून व्यसनमुक्ती अभियान राबवत, ग्रामिण भागातील माता भगिणींमध्ये वाढणार्‍या स्तनांच्या कॅन्सरविषयी जनजागृती अभियानही राबविले.

इतकंच नाही तर मुलांना मोबाईलपासून परावृत्त करण्यासाठी "शोध एकलव्याचा" ही अभिनव स्पर्धा राबविली. तारांगणाच्या माध्यमातून मुलांना चांद्रयान, सुर्ययान, सौरऊर्जेवर प्रात्यक्षिक दाखविले. गणेशोत्सवातून जनजागृतीच्या ह्या प्रवासात कल्पकरित्या गणेशोत्सव साजरा करत यंदा मंडळाने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देखावा उपलब्ध केला.

शिक्षण पंढरी असलेल्या लातूरात गरजूंसाठी शालेय तथा ११ वी १२ वी च्या अभ्यासक्रमाची पुस्तकं तर NEET - IIT ची पुस्तकेही उपलब्ध करुन दिली

थोडक्यात काय तर सिद्धेश्वरी पावनभूमीत केवळ गणेशोत्सवाचे १० दिवस उपक्रम न राबविता, बप्पा गणेश मंडळ, आपण समाजाचे देणं लागतो या नैतिक भावनेतून वर्षभर कार्यरत असतं. मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंतर्मनात जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना तेवत असते. त्यातूनच उर्जा घेऊन मंडळ व मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री. आनंद राचट्टे यांनी दिली.
Previous Post Next Post