गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूरचे भ्रष्टाचारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी(RTO) विजय भोये सह तिघांना पोलीस कोठडी
लातूर : खासगी निमआराम बसला ३ महिन्यांचा परवाना देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३ हजार रुपये लिपिकामार्फत स्वीकारताना लातूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) विजय भोये व त्यांच्या कार्यालयातील एका लिपिकासह दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही घटना गुरुवारी (दि.१२) सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास • आरटीओ कार्यालयातून घडली. याचवेळी भोये यांच्या लातूर, नाशिक व मुंबईतील घरावरही एसीबीने छापे मारले. याप्रकरणी शुक्रवारी ४.५५ वाजता येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इतक्या मोठ्या क्लास वन अधिकाऱ्याच्या लाचखोरीच्या प्रकरणाने परिवहन विभागात खळबळ माजली आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाकडे जुन्या ट्रॅव्हल्स असून परवाना मुदत संपल्यामुळे त्या सध्या रस्त्यावर धावत नाहीत. परंतु, सहलीला जाण्यासाठी शाळा-महाविद्यालयांची मागणी आल्यानंतर त्या ट्रॅव्हल्स पुरवल्या जातात. अशा ट्रॅव्हल्सना जेवढे दिवस चालवायचे आहे, तेवढ्या दिवसांचा परवाना आरटीओ देतात. अशाच एका प्रकरणात एका फिर्यादीने त्याच्या ट्रॅव्हल्सला काही दिवसांचा मुदती परवाना मिळण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे मागणी अर्ज केला होता. तो मंजूर करण्यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
(एआरटीओ) विजय चिंतामण भोये (४६, रा. साईधाम सोसायटी, लातूर) या ट्रॅव्हल्स मालकाकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३ हजारांवर व्यवहार ठरला होता. सदर पैसे कोणाकडे देऊ, असे विचारण्यासाठी सदर फिर्यादीने एआरटीओ भोये यांना फोन केला. त्यावेळी ते पैसे त्याच कार्यालयातील प्रमोद उत्तमराव सोनसाळी यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने सदर ३ हजार रुपयांची रक्कम प्रमोद सोनसाळी या लिपिकाकड़े गुरुवारी सायंकाळी दिली.
लिपिकासह (दि. १३) पहाटे अटकेत, विवेकानंद चौक मुंबईतील दलाल लातूर, नाशिक, गेले. त्या लिपिकाने मुंबईतील घरांवर छापे पंचासमक्ष घरांवर छापे
सदर रक्कम घेऊन फिर्यादी व लिपीक भोये यांच्या कार्यालयात व्यक्तीने ३ हजार रुपये दिल्याचे सांगितले. त्यावर भोये यांनी हो, असे सांगताच सापळा लावून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एआरटीओ भोये, लिपिक प्रमोद सोनसाळी व या व्यवहारातील दलाल जीलानी महेबूब शेख या लाचखोर त्रिकुटाला ताब्यात घेतले. ही कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर भोये, सोनसाळी व शेख या तिघांनाही ताब्यात घेऊन प्रतिबंधकच्या कार्यालयात आणण्यात आले. भोये यांच्या लातूर येथील निवासस्थानाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडती घेतली. त्याचवेळी नासिक व मुंबईतील घरावरही त्या ठिकाणच्या एसीबीने छापे मारले. मात्र या छाप्यात त्यात पथकाला काहीही सापडले नसल्याचे सांगण्यात आले. कार्यवाहीच्या संपूर्ण औपचारिकतेनंतर शुक्रवारी पहाटे ४.५५ वाजता विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकेची कार्यवाही करण्यात आली.