गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूरचे भ्रष्टाचारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी(RTO) विजय भोये यांच्यासह दोघांना जामीन मंजूर
सलग तिन दिवस लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश
लातूर :लातूर मध्ये अधिकार्यांनी सध्या जणतेला लुटण्याचे जणू प्रमाणपत्र च मिळविले आहे कि काय आशाप्रमाणे आर टी ओ कार्यालयाचा कारभार चालत होता
लातूर परिवहन कार्यालय मागील काही महिन्यांपासून तेथील एजांटांमुळे बदनाम होत चालले आहे ..एजंटासोबत काही अधिकारी कर्मचार्यांची मिलीभगत असल्याकारणाने सर्वसामान्य जनतेची लुट मात्र थांबताना दिसत नाही.असाच या अधिकार्यांचा फटका काही ट्रॅव्हल्स मालकांना बसल्यामुळे काहि महिन्यापुर्वी लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांना लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांमार्फत होत असलेली आर्थिक लूट त्वरित थांबवावी यासाठी निवेदन देण्यात आले होते परंतू आशा निवेदनाला केराची टोपली दाखवून हा अधिकारी गाङया रजिस्ट्रेशन,नवीन लायसन,लोडेड गाड्या,टीपी परवाने च्यानावाने सर्रास पैशे उकळत होता.अशा लातूर मधील भ्रष्टाचाराची फॅक्टरी असणारा या मुजोर आणि भ्रष्ट लातूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) विजय भोये व त्यांच्या कार्यालयातील एका लिपिकासह दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.१२) सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले होते.खाजगी निमआराम बसला ३ महिन्यांचा परवाना देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३ हजार रुपये लिपिकामार्फत स्वीकारलेले ही घटना आरटीओ कार्यालयातून घडली होती याचवेळी भोये यांच्या लातूर, नाशिक व मुंबईतील घरावरही एसीबीने छापे मारले होते.परंतू त्याठिकाणी रोख रक्कम व कागदपत्रे सापडले नाहित.इतक्या मोठ्या क्लास वन अधिकाऱ्याच्या लाचखोरीच्या या प्रकरणाने परिवहन विभागात खळबळ माजली होती.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर मंगळवार दि 17आक्टोंबर रोजी भोये यांच्यासह कार्यालयातील लिपिक प्रमोद सोनसाळी व या व्यवहारातील दलाल जीलानी महेबूब शेख या लाचखोर त्रिकुटाला ५०हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.मात्र सलग तिन दिवस लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश जामीन देताना न्यायालयाने दिले आहेत