वासनगाव शिवारात अवैध जुगारावर छापेमारी , 13 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 6 लाख 2 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलीस पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाची रात्रगस्त दरम्यान कारवाई.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाने लातूर ते औसा जाणारे रोडवर एका ढाब्याच्या पाठीमागे पत्राच्या शेड मधील मोकळ्या जागेत वासनगाव शेत शिवारामध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. येथून पोलिसांनी 6 लाख 02 हजाराचे मुद्देमाल जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री करण्यात आली .
पोलिस अधीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम नमूद ठिकाणी पैशावर तिर्रट जुगार खेळत आहेत अशी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर साहेब पोलीस अधीक्षक निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे यांनी वासनगाव शिवारातील एका धाब्याच्या पाठीमागे शेडमध्ये छापेमारी करून बेकायेशीररित्या जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने एकूण 13 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 6 लाख 02 हजार 360 रुपयाचा मुद्देमाल तसेच एक फूट लांबीची लाकडी मूठ असलेली सुरी जप्त करण्यात आली आहे.
पोलीस ठाणे लातूर ग्रामीण मध्ये खालील नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) व भारतीय हत्यार अधिनियम कलम 4, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1) गणेश शरनअप्पा चटनाळे, वय 25 वर्षे, रा. कळंब रोड लातूर.
2) ताहेर युसुफ शेख, वय 33 वर्षे रा. कळंब जि.उस्मानाबाद
3) नसीर इब्राहीम कुरेशी, वय 33 वर्षे रा. कुरेशी मोहल्ला, लातूर.
4) आकाश होदाडे (फरार)
5) अहर सयद रा. खडक हनुमान लातूर.(फरार)
6) आपटे रा. आंबेजोगाई (फरार)
7) गणेश रा. लातूर (फरार)
8)अल्ताफ रा.लातूर (फरार)
10) महम्मद रा. पटेल चौक लातूर(फरार)
11) अझहर सयद रा.साठफुटी रोड लातूर (फरार)
12) सचिन काळे, रा.राठोडा(फरार)
13) मनोहर देविदास रा. कन्हेरी तांडा लातूर (फरार)
असे असून आरोपी क्रमांक 4 ते 13 अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून आरोपी क्रमांक चार आकाश होदाडे (फरार) याच्या कमरेला असलेली स्टील ची सुरी जागेवरच टाकून तो पळून गेला. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे.
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 03/11/2023 रोजी पोलीस लातूर ग्रामीण हद्दीत कारवाईत पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अधिकारी/अंमलदार कामगिरी केली आहे. पुढील तपास लातूर ग्रामीण पोलिस करीत आहेत.