जुगार अड्ड्यावर छापा, 15 इसमाविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल. 05 लाख 18 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगीरी
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 23/11/2023 रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भादा पोलीस ठाणे हद्दीतील संत शिरोमणी सहकारी साखर कारखाना ते गुळखेडा जाणारे रोडवर गुणवंत लोहार याचे शेतातील पत्र्याच्या शेडवर छापा मारला असता तेथे इसम नामे-
1) धनराज राम गिरी, वय 35 वर्ष, राहणार टाका तालुका औसा जिल्हा लातूर.
2) अजमेर महबूब, 34 वर्ष राहणार आशिव तालुका औसा जिल्हा लातूर.
3) चांद मन्सूर शेख, वय 55 वर्ष, राहणार आशिव तालुका औसा जिल्हा लातूर.
4) बाळासाहेब महादेव शिरसले वय 50 वर्ष राहणार गुळखेडावाडी तालुका औसा जिल्हा लातूर.
5)खंडू फुलचंद भोसले, वय 35 वर्ष, राहणार गुळखेडा तालुका औसा जिल्हा लातूर.
6)पुनर्रथ हरिबा डोलारे, वय 58 वर्ष, राहणार सोनंचिंचोली तालुका औसा जिल्हा लातूर.
7) कोंडीबा निवृत्ती साठे, वय 41 वर्ष, राहणार सोनचिंचोली तालुका औसा जिल्हा लातूर.
8) दिलीप हनुमंत गोरे, वय 64 वर्ष, राहणार टाका तालुका औसा जिल्हा लातूर.
9)काकासाहेब नागोराव गायकवाड, वय 42 वर्ष, राहणार टाका तालुका औसा जिल्हा लातूर.
10)हंसराज सुभाष गोरे, वय 49 वर्ष, राहणार ठाकूर राहणार टाका तालुका औसा जिल्हा लातूर.
11) मुरलीधर विश्वनाथ गोरे, वय 51 वर्ष, राहणार तावशी तालुका औसा जिल्हा लातूर.
12) अशोक अर्जुन कांबळे, वय 51 वर्ष, राहणार आशिव तालुका औसा जिल्हा लातूर.
13) अहमद करीम शेख राहणार टाका तालुका औसा जिल्हा लातूर (फरार)
14) गुंडीबा साठे, राहणार सोन चिंचोली तालुका औसा जिल्हा लातूर.(फरार)
15) सुरेश आंबेकर राहणार आशिव तालुका औसा जिल्हा लातूर.(फरार)
असे नमूद ठिकाणी ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने असा एकूण 05 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे भादा येथे कलम 12(अ) मुंबई जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद मुद्देमाल व 12 इसमांना पुढील तपास कामी भादा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.उर्वरित फरार तीन इसमाचा शोध सुरू आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे , नितीन कठारे ,मनोज खोसे, राहुल कांबळे, प्रदीप चोपणे यानी केली आहे.