Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आटोळाच्या सरपंच-ग्रामसेवकाने संगनमताने बनावट फेरफार करुन दिला प्लॉटचा नमुना नंबर 8

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
आटोळाच्या सरपंच-ग्रामसेवकाने संगनमताने बनावट फेरफार करुन दिला प्लॉटचा नमुना नंबर 8
शिवा संघटनेची सीईओ, एसपी,बीडीओंकडे तक्रार,आठ दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन


लातूर,दि.24ः चाकूर तालुक्यातील आटोळा येथील सरपंच आणि ग्रामसेवकांनी अधिकाराचा गैरवापर करत गावातील एका जमीनीच्या खरेदी खतावरुन नियमबाह्य ठराव करुन,ग्रामपंचायत कार्यालयात प्लॉट म्हणून नमुना नंबर 8 बहाल केल्याचा आरोप करत,त्या दोघांना निलंबीत करुन,आठ दिवसात फसवूणकीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आपल्या कार्यालयांपुढे गावकर्यांसह तीव्र आंदेालन करण्यात येईल,अशा इशारा गर्भित शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक संघटनेचे राज्य सदस्य दत्ताभाऊ खंकरे आदिंनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक व चाकूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना 22 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, आटोळा,ता.चाकूर येथील कलप्पा मल्लिकार्जून मिटकरी यांनी गट नं.167 मधील 2 आर जमिनीत विहीर पाडण्यासाठी शिवदास बसवंत मोेतीपवळे यांना अंतेश्‍वर कल्लाप्पा तोडकरी यांची वाटणीस आलेल्या जमिनीची चुकीची चतुःर्सिमा दाखवून खरेदीखत करुन दिले.
कलप्पा तोडकरी यांनी शिवदास मोतीपवळे यांना 2 आर दिलेल्या जमिनीसह 52 आर जमीन जशास तसे दुबार खरेदीखत करुन आपल्या पत्नीच्या नावे करुन दिले. याबाबत कलप्पा तोडकरी यांनी एकच जमीन दोनदा खरेदी खत करुन दिल्याची तक्रार अंतेश्‍वर तोडकरी यांनी आटोळाचे सरपंच व ग्रामसेवकांना दिली होती.तरीही सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगनमताने 7/12 वर फेर न होता केवळ जमीन रजिस्ट्रीमध्ये खोट्या चतुःर्सिमा अंतेश्‍वर तोडकरी यांच्या जमिनीच्या दाखवून खोटा ठराव करुन नमुना नं.8 अ दिले.हावगीराव तोडकरी व रेणुका तोडकरी यांना कोणत्याच कागदोपत्री पुराव्याशिवाय दिलेल्या नमुना नंबर 8 मधील ग्रामपंचायत मिळकत नं.432 व 782 च्या मालकीचा नमुना 8 अ तात्काळ रद्द करावा.
आटोळा येथील नमुना नंबर 8 अ चे व फेरफार नक्कल रजिस्टर माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती पण ग्रामसेवकांनी लेखी स्वरुपात फेर नक्कल रजिस्टर आमच्याकडे उपलब्ध नाही,अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
कलप्पा तोडकरी,विमलाबाई कलप्पा तोडकरी,शिवदास मोतीपवळे तसेच सरपंच,ग्रामसेवक यांनी संगनमताने अंतेश्‍वर तोडकरी यांच्या जमिनीची खोटी चतुःर्सिमा दाखवून शिवदास मोतीपवळे यांंची खोटी नोंद घेतलेल्या नमुना नंबर 8 अ तात्काळ रद्द करावा,पदाचा गैरवापर करणारे सरपंच व ग्रामसेवकांना पदावरुन निलंबीत करुन त्यांच्यावर फसवूणकीचा गुन्हा दाखल करावा,आणि अंतेश्‍वर तोडकरी यांना आठ दिवसात न्याय द्यावा, आपल्या कार्यालयासमोर शिवा संघटनेच्यातीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा राज्य सदस्य दत्ताभाऊ खंकरे तसेच विलास खिंडे, अंतेश्‍वर तोडकरी,राजेंद्र पांडे व दशरथ पांडे,किरण आप्पा खोबरे जगन्नाथ कोळंबे शिवहार वाडकर मनोज हंसनाळे श्रीकांत काळे उमाकांत पाटील दादा पांडे,यांनी सदर निवेदनात दिला आहे.
Previous Post Next Post