लातुर येथे अंधांची राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन
लातूर/प्रतिनिधि
क्रिकेट असोशिएशन फॉर दि ब्लाईंड ऑफ महाराष्ट्र (CABM) ही संस्था गेली अनेक वर्षांपासून अंधांच्या क्रिकेट व इतर खेळासह सॉफ्ट स्कील विकासात सातत्याने कार्यरत आहे. या उद्देशपूर्तीसाठी संस्थेद्वारे वेळोवेळी स्थानीक, विभागीय, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण शिबीरे व स्पर्धाचे आयोजन केले गेले आहे. या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे शेकडो अंध व्यक्तींनी क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवीले आहे. तसेच अनेक खेळाडूंनी विविध खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले क्रीडा नैपुण्य सिद्ध केले आहे.
या वेळी संस्थेने ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर दि ब्लाईंड (AICFB) संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने दि. ०२-०१-२०२३ ते ०६-११-२०२३ दरम्यान लातूर येथे अंधांच्या राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत देशातील पूर्व, पश्चीम, दक्षीण व उत्तर विभागीय स्तरावर संपन्न स्पर्धेतून निवडल्या गेलेल्या ५० अंध खेळाडू व त्यांच्या २० साह्यकांचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेत एकूण ७ फेन्या खेळवल्या जाणार असून स्पर्धेचा उद्घाटन समारोह दि. ०३/११/२०२३ रोजी सकाळी १० वा. महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. दि. ०३ ते ०५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान ७ फेन्यातून सदर स्पर्धा संपन्न होणार आहे. स्पर्धेचा पुरस्कार वतरण समारोह दि. ५/११/२०२३ रोजी सकाळी ११:३० वा. संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाच्या नाष्टा व जेवणाची व्यवस्था समर्पण फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे.व जाताना त्यांना एक बॅग भेट महणून देण्यात येणार असल्याचे सांगीतले आहे