राष्ट्रीय बाल दंतरोग परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील डॉ. योगेश काळे यांच्या संशोधनास प्रथम पुरस्कार
लातूर, दि. 10 – इंडियन सोसायटी ऑफ पिडोडॉन्टीक्स ॲण्ड प्रिव्हेन्टीव डेन्टीस्ट्री (ISPPD) यांच्या वतीने ‘पिडियाट्रीक्स ॲण्डा प्रिव्हेन्टीव डेंटिस्ट्री’ या विषयावर 44 वी राष्ट्रीय बाल दंत रोग परिषद नुकतीच अहमदाबाद, गुजरात येथे घेण्यात आली. या परिषदेत लातूर येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील बाल दंत रोग विभाग प्रमुख डॉ. योगेश काळे यांनी सादर केलेल्या शोध निबंधास प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रीय बाल दंत रोग परिषदेत डॉ. योगेश काळे यांनी परिषदेच्या पहिल्या सत्रात शिक्षक प्रवर्गात ‘सायटॉ टॉक्सीन इफेक्टस ऑफ ईडीटीए ॲण्ड ईडीटीए मॉडीफाईड बाय सिल्व्हर नॅनो पार्टीकल्स ऑन ह्युमन पेरोडोन्टल लिगामेंट फायब्रो ब्लास्ट’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. या शोध निबंधासाठी डॉ. काळे यांना बेस्ट पेपर अवॉर्ड मिळाला असून प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आल.
या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील बाल दंत रोग विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसन्ना डहाके यांनी शोधनिबंध सादर केला. त्याचबरोबर या विभागातील एम.डी.एस. पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. निकेता देशमुख, डॉ. पुजा गोपाळघरे, डॉ. समंती गांधी यांनी बाल दंत रोग या विषयावर शोध निबंध सादर केला तर डॉ. उमेश केंद्रे, डॉ. अनुजा भताने, डॉ. पुर्वा बाभुळगावकर व डॉ. सोनाली लिंगायत यांनी पोस्टरचे सादरीकरण करुन परिषदेत सहभाग नोंदवला. तसेच या परिषदेतील वैज्ञातीक सत्रात डॉ. योगेश काळे व डॉ. महेश दडपे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
या यशाबद्दल डॉ. योगेश काळे यांचे एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, उप प्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी यांच्यासह एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील डॉक्टर व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन होत आहे.