Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी जालना येथे आमरण उपोषण

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी जालना येथे आमरण उपोषण 

 


ब्राह्मण समाजाच्या मागण्या साठी जालना येथे २८ नोव्हेंबर पासून जालना येथे दिपक रणनवरे हे आमरण उपोषणास बसत असून महाराष्ट्र सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजाला स्वतंत्रपणे तातडीने जाहीर करावे अन्यथा संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती तिव्र आंदोलन करेल असे मुख्य समन्वयक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. 

समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीची बैठक संभाजी नगर येथे पार पडली यावेळी आमरण उपोषणास बसत असलेले दिपक रणनवरे जालना यांच्या सह सौ विजयाताई कुलकर्णी संभाजी नगर  , ॲड राजेंद्र पोतदार वसमत , विश्वजीत देशपांडे पुणे , श्रीकांत जोशी अकोला ,  मुकुंद कुलकर्णी जिंतुर , ॲड भानुदास शौचे नाशिक  ,अशोक वाघ जळगाव , मकरंद कुलकर्णी कोल्हापूर , जोशी धाराशीव , योगेश जानतीकर उपस्थित होते यावेळी ब्राह्मण समाजाच्या १९४८ पासून झालेल्या दयनीय परिस्थिती वर चर्चा झाली यामधे सध्याच्या काळात शिक्षण , व्यवसाय साठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे अतिशय खडतर जिवन जगावे लागत असून एकतर शिक्षण सोडून देणे तसेच व्यवसाय करायची इच्छा व पात्रता असतानाही सगळं सोडून द्यावे लागते यासाठी कोणत्याही तारणाशिवाय थेट सहाय्य मिळावे कारण असंख्य ब्राह्मणाकडे गुणवत्ता असून देखील शिक्षण व व्यवसाय करता येत नसल्यामुळे नैराश्य येत असल्यामुळे सामाजिक परिस्थिती अतिशय गंभीर बनत आहे . त्यातच ब्राह्मण समाजावर विनाकारण टीका व द्वेषपुर्ण टिप्पणी करून संपूर्ण ब्राह्मण समाजाला दोषी भावनेने सामाजिक विष पेरले जाते याचा परिणाम ब्राह्मण समाजाला अतिशय वाईट परिस्थितीशी संघर्ष करत जिवन व्यथित करावे लागत असल्यामुळे ब्राह्मण समाजाची सामाजिक आर्थिक परिस्थिती गंभीर बनली आहे यामुळे लोकशाही प्रक्रियेत असणाऱ्या अधिकाराचा वापर करत आमरण उपोषण करून महाराष्ट्र सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात यासाठी २८ नोव्हेंबर पासून जालना येथे गांधी चमन याठिकाणी आमरण उपोषण केले जाणार आहे तसेच ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकर मान्य न केल्यास महाराष्ट्र राज्यात प्रत्येक तालुक्यात गावात वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन केले जाईल याची गंभीर दखल सरकारने घ्यावी तसेच महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण समाजानी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करावे असे आवाहन  धनंजय कुलकर्णी यांनी केले
Previous Post Next Post