Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्हा परिषदेत खळबळ; शिक्षकांच्या बिंदुनामावलीच्या चौकशीसाठी समिती स्थापन

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर जिल्हा परिषदेत खळबळ; शिक्षकांच्या बिंदुनामावलीच्या चौकशीसाठी समिती स्थापन

लातूर जिल्हा परिषदेतील प्रकार : चार अधिकाऱ्यांचा समावेस १६६ शिक्षकांची नावे केली कमी, ८८ शिक्षकांची दुबार नोंद



 विभागीय आयुक्त कार्यालयातील मागास वर्ग कक्षाने केलेल्या तपासणीमध्ये लातूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावलीत १६६ शिक्षकांची नावे कमी केल्याचे तर ८८ शिक्षकांची नावे दुबार असल्याचे दिसून आले. ही बाब गंभीर असल्याने विभागीय उपायुक्तांनी या प्रकरणी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात जवळपास ४ हजार ९०० शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेने ३१ जानेवारी २०२० मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयातील मागास वर्ग कक्षाकडून बिंदू नामावली तपासून घेतली होती. त्यानंतर २८ ऑगस्ट २०२३ रोजी पुन्हा तपासणीकरून प्रमाणित करण्यासाठी सादर केली होती. परंतु सहायक आयुक्तांना बिंदू नामावली तपासणी अनेक गंभीर बाबी दिसून आल्या. बिंदू नामावलीतील १६६ कर्मचाऱ्यांची नावे बिंदू नामावलीतून कमी करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच ८८ शिक्षकांची नावे दुबार नोंद झाल्याचेही आढळून आले. बिंदू नामावलीत नोंद घेण्यास पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांची नोंद घेतल्याचे आल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळेच विभागीय उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी नांदेड

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. इतर सदस्यांमध्ये धाराशीव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर समाज कल्याण अधिकारी, सदस्य सचिव लातूर जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.

प्रत्यक्ष कार्यरत नसलेल्या १६६ कर्मचाऱ्यांची नावे बिंदू नामावलीत कशाच्या अधारे नोंदविण्यात आली होती, दुबार नोंद असलेल्या ८८ कर्मचाऱ्यांची नावे खरोखरच दुबार घेण्यात आलेली आहे का, याची खात्र कारवी, बिंदू नामावलीत अस्तित्वात नसलेल्या व दुबार नोंद घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले त्यांची नावे पदनाम व कालावधी घ्यावा, अस्तित्वात नसलेल्या व दुबार नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते त्याच प्रमाणे इतर आर्थिक लाभ देण्यात आला आलेला आहे का आणि बिंदू नामवाली अद्यावत करून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे का, या सर्व बाबींची सखोल चौकशी ही समिती करणार आहे. चौकशीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचेही उपायुक्त बेदमुथा यांनी आदेशात म्हटले आहे. या चौकशी समितीमुळे जिल्हा परिषदेच्या कारभाराचे पितळ उघडे पडणार असल्याने अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
Previous Post Next Post