Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

श्री मनोज जरांगे पाटील यांची माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतली भेट

श्री मनोज जरांगे पाटील यांची 
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतली भेट





लातूर प्रतिनिधी : १०.११.२३
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सातत्याने लढा देत असलेले श्री मनोज
जरांगे पाटील यांची आज छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये
जाऊन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार
दि. १० नोव्हेंबर रोजी भेट घेतली. यावेळी त्यांनी आवश्यकतेनुसार नियमित
औषधोपचार घ्यावेत, आराम करावा, काळजी घ्यावी असे सांगून त्यांची प्रकृती
लवकरात लवकर ठणठणीत बरी व्हावी अशा शुभेच्छा या प्रसंगी दिल्या.
यावेळी बोलतांना श्री मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आपला पाठिंबा
असल्याचे नमूद करून राज्य आणि केंद्र शासनाने आता वेळ न घालवता लवकरात
लवकर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे अशी आपली भूमिका असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक सलोखा कायम राखणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे, सामाजिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी करू
नयेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, तथा जिल्हा
काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ
काळे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते
भाऊसाहेब जगताप, छत्रपती संभाजीनगर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख
युसुफ यांचेसह सहकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post