Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हा सरचिटणीपदी अशोक माळगे

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हा सरचिटणीपदी अशोक माळगे


 लातूर, दि.03 : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या लातूर जिल्हा सरचिटणीसपदी अशोक माळगे यांची निवड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक अधीक्षक श्री. माळगे यांच्या या निवडीबद्दल नागपूर येथील अधिवेशनात श्री. इंगळे यांनी सत्कारही केला.

कार्याध्यक्ष गणेश मडावी, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष सुमित भुईगळ यांच्या सूचनेनुसार श्री.माळगे यांची निवड झाली. यासंबंधीचे नियुक्तीपत्र लातूर जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे यांनी नुकतेच त्यांना दिले. संघटनेतील सक्रिय सहभागाची दखल घेऊन श्री. माळगे यांची निवड झाल्याचे बनसोडे म्हणाले.

या निवडीबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचारी, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, लातूर उपाध्यक्ष गणेश राठोड, कोषाध्यक्ष प्रशांत म्हेत्रे, जिल्हा संघटक नागरत्न कांबळे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष मस्के, जिल्हा परिषदेचे सुधीर बोकेफोडे, ओमकार वंजारे, पाटबंधारे विभागाचे निलराज बनसोडे, आरोग्य विभागाचे रवी उदगीरकर, प्रसिद्धी प्रमुख बालाजी केंद्रे, विविध संघटनांचे पदाधिकारी आदींनी श्री. माळगे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले.       
Previous Post Next Post