दिपावलीनिमित्त माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी
नागरिकांच्या घेतल्या भेटी
सर्वांना दिपावलीच्या दिल्या शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी शनीवार दि. ११ नोव्हेंबर २३ :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार
दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासहजिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या निवेदनाचा व आमंत्रणचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, विलासको-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, महाराष्ट्र प्रदेशकाँग्रेसचे पदाधिकारी भाई नागराळे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे
उपसभापती सुनील पडिले, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके,एनएसयुआय लातूर जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, अभिमान भोळे, व्यंकट कासले,बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, हणमंत पवार, सिकंदर पटेल, उदयसिंह
देशमुख, बालाजी साळुंखे, सुरेश चव्हाण, सदाशिव कदम, समर्थ सहकारीगृहनिर्माण संस्था लातूरचे अध्यक्ष डी.टी. देवणे, सचिव एस.एच.मोरे,डी.टी. कदम आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक
उपस्थित होते.